भाजपसाठी मोठी बातमी; 'हा' संपूर्ण पक्षच होणार विलीन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

भारतीय जनता पक्षासाठी एक दिलासादायक बातमी आहे. झारखंडमधील संपूर्ण पक्षच भाजपमध्ये विलीन होणार आहे. झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी १४ वर्षांनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याच्यासोबत त्यांचा झारखंड विकास मोर्चा नावाच्या पक्षाचेही भाजपमध्ये विलीनीकरण होणार आहे.

रांची : भारतीय जनता पक्षासाठी एक दिलासादायक बातमी आहे. झारखंडमधील संपूर्ण पक्षच भाजपमध्ये विलीन होणार आहे. झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी १४ वर्षांनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याच्यासोबत त्यांचा झारखंड विकास मोर्चा नावाच्या पक्षाचेही भाजपमध्ये विलीनीकरण होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१७ फेब्रुवारीला यासाठी रांचीत एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी झारखंड विकास मोर्चा भाजपमध्ये विलीन केला जात असल्याची घोषणा मरांडी हे करतील. बाबुलाल मरांडी यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेत हा निर्णय घेतला आहे. 

राहुल मंदिरात जाऊ लागले, केजरीवाल हनुमानभक्त झाले- चंद्रकांत पाटील

नड्डा आणि मरांडी यांच्यात झालेल्या बैठकीत झारखंड विकास मोर्चाच्या भाजपमधल्या विलीनीकरणाचा दिवस निश्चित करण्यात आला. याआधी मरांडी यांनी अमित शहांची भेट घेतली होती. तत्पूर्वी, झारखंड विकास मोर्चानं ११ फेब्रुवारीला केंद्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली आहे. यामध्ये झारखंड विकास मोर्चाचा विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर याबद्दल निवडणूक आयोगाला माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सुमी आणि समर करत आहेत सेलिब्रेशन; कारण आहे खास

तत्पूर्वी, २००६ मध्ये बाबुलाल मरांडी यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी झारखंड विकास मोर्चाची स्थापना केली. गेल्या डिसेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळीच मरांडी घरवापसी करतील, अशी चर्चा होती. या निवडणुकीत मरांडी यांच्या पक्षाला केवळ पाच जागा मिळाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Babulal Marandi may be back in BJP fold