'मुजोर वाळुमाफियांवर तत्काळ कारवाई करा, नाहीतर...'; तहसीलदारांनी दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

महसूल अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांवर वारंवार जीवघेणे हल्ले होत आहेत. संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई न झाल्यामुळे वाळूमाफीयांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे.

पुणे : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुजोर वाळूमाफीयांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच, जिल्हा खनिज निधीमधून सशस्त्र सुरक्षा रक्षक पुरविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले. 

पोलिसाच्या अंगावर गाडी घातली अन् ठोकली धूम; येरवड्यातील प्रकार​

वाळूची अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार पवार आणि तलाठी कारवाई करण्यास गेले. परंतु वाळूमाफियांनी २३ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास पवार यांच्यावर चाकूने वार करून पवार यांना गंभीर जखमी केले. या भ्याड, निर्दयी हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने निषेध नोंदविला आहे. तसेच, मागण्यांची पूर्तता होईपर्यंत अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणी महसूल विभागामार्फत प्रतिबंधात्मक कार्यवाही पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याचा इशारा दिला आहे. 

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, अभ्यासात अडचणी येताहेत? मग ही बातमी वाचाच!​

महसूल अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांवर वारंवार जीवघेणे हल्ले होत आहेत. संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई न झाल्यामुळे वाळूमाफीयांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वीही बंदुकीचा धाक दाखविणे, अंगावर ट्रॅक्टर, ट्रक घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. याबाबत महसूल संघटनेने सशस्त्र सुरक्षा रक्षक देण्याबाबत मागणी केली होती. परंतु मागणीची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. आरोपींना अटक न झाल्यास २७ जानेवारी रोजी अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांत कामबंद आंदोलन करण्यात आले. तसेच] उर्वरित विभागात घटनेचा निषेध नोंदवत काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. 

शेतकरी आंदोलनाला गालबोट लावणारा दीप सिद्धू आहे तरी कोण?

अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी 
नायब तहसीलदार यांच्या ग्रेड पेमध्ये सुधारणा करण्यात यावी. नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी. या मागण्यांबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेमार्फत दोन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र स्तरावर सामुदायिक रजा आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही निर्णय न झाल्यास आठ मार्चपासून राज्यात बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tehsildar Association demanded immediate action against sand mafia to Revenue Minister Balasaheb Thorat