Pune News : ६३ हजार किमीचा प्रवास करत या अवलियाने भारताच्या वारसा स्थळांचे केले दस्तावेजीकरण

सहकुटुंब केरळचा दौरा केला... तेथे पक्ष्यांच्या विशिष्ट प्रजाती पाहिल्या... अन् मग जडला छंद तो वन्यजीव आणि परिसंस्थेला (इकोसिस्टिम) अधिक जवळून समजून घेण्याचा...
Tehzun Karmalavala
Tehzun Karmalavalasakal

पुणे - सहकुटुंब केरळचा दौरा केला... तेथे पक्ष्यांच्या विशिष्ट प्रजाती पाहिल्या... अन् मग जडला छंद तो वन्यजीव आणि परिसंस्थेला (इकोसिस्टिम) अधिक जवळून समजून घेण्याचा... केवळ छंद म्हणून नव्हे तर भारताच्या या समृद्ध जैवविविधता व ऐतिहासिक वारशांबाबत जगालाही समजावे यासाठी त्यांनी त्याचे दस्तावेजीकरण केले. ही कामगिरी केली आहे पुण्यातील ४२ वर्षीय तेहझून करमलावाला या अवलियाने.

तेहझून हे पुण्यातील आनंदवन फाउंडेशनचे सदस्य असून ‘अर्बन फॉरेस्ट’च्या निर्मितीत हातभार लावत आहेत. पर्यावरणाबद्दलचे प्रेम आणि त्याच्या संवर्धनासाठी असलेली संवेदना यासाठी त्यांनी देशाच्या विविध राष्ट्रीय उद्यानांसह, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, जागतिक वारसा स्थळांना भेट देत त्यांचे दस्तावेजीकरण केले आहे.

यासाठी त्यांनी १८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६३ हजार किलोमीटरचा प्रवास करत एक इतिहास रचला. या अतुलनीय कामगिरीसाठी तेहझून यांच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया’मध्ये करण्यात आली आहे.

आपल्या प्रवासाबाबत तेहझून सांगतात, ‘केरळमध्ये जेव्हा निरनिराळ्या पक्ष्यांच्या प्रजाती पाहताच मी मंत्रमुग्ध झालो. देशाच्या नैसर्गिक वारशाचा प्रत्यक्ष अनुभव घेत त्याचे छायाचित्र पुस्तक व व्हिडिओच्या माध्यमातून दस्तावेजीकरण करण्याचा संकल्प केला. खरंतर लॉकडाऊनच्या काळात निसर्गाशी जोडले गेलो. त्यानंतर या मोहिमेची योजना आखण्यास सुरुवात केली.

Tehzun Karmalavala
Health University : आरोग्य विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेचा तिसरा टप्प्यास मंगळवारपासून सुरवात

अखेर संपूर्ण मोहिमेदरम्यान वाळवंटापासून ते हिरवाईच्या जंगलांपर्यंत अशा वैविध्यपूर्ण भूप्रदेशाचा अनुभव घेतला. हिमालयाच्या उंच शिखरांपासून पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध पश्चिम आणि पूर्व घाटापर्यंत, मध्यवर्ती पठारापासून ते मनमोहक अंदमान बेटांपर्यंतचा प्रवास केला. बदलत्‍या हवामानाच्या परिस्थितीचीही अनुभूती झाली.’

या प्रवासादरम्यान अनेक आव्हाने आली. निर्बंधांमुळे काही राष्ट्रीय उद्यानांमध्‍ये जाण्याची संधी मिळाली नाही, तर काही ठिकाणी सुविधांचा अभाव, प्रवासातील अडचणी असतानाही मागे न फिरता मोहीम सुरूच ठेवली, असेही त्यांनी सांगितले.

Tehzun Karmalavala
Pune News : आयुर्वेदाचे मार्केटिंग करा - डॉ. प्रमोद सावंत

छायाचित्रे, व्हिडिओंची मालिका

पुण्यातून या अनोख्या प्रवासाची सुरूवात झाली, ती १९ ऑक्टोबर २०२१ मध्ये. मोहिमेदरम्‍यान वाहनातून प्रवास केला, तसेच काही ठिकाणी ट्रेंकिगही केले. ही संपूर्ण मोहीम ३० एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण झाली. या मोहिमेत दरम्यान टिपण्यात आलेली छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून १२ भागांची मालिका तयार करणार आहे. तसेच सुमारे ३०० छायाचित्रांचे पुस्तकात रूपांतर करणार आहे, असे तेहझून म्हणाले.

अठरा महिन्यांच्या प्रवासात

एकूण १०४ राष्ट्रीय उद्याने

१७ - आरक्षित जीवसंवर्धन प्रदेश (बायोस्फिअर रिझर्व)

५४ - व्याघ्र प्रकल्प

३२ - हत्ती अभयारण्ये

४० - हून अधिक जागतिक वारसा स्थळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com