तेजसाचा खून झाल्याचे निष्पन्न; अटक आरोपी घटनास्थळी होते हजर

Tejasaa was murdered in Manik Baug at pune
Tejasaa was murdered in Manik Baug at pune

पुणे : माणिकबाग येथील एका इमारतीमध्ये आढळलेल्या तरुणीचा खूनच झाला असून घटनास्थळी हजर असलेल्या तिघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींत एक महिलेचा समावेश आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती आली आहे.

महत्त्वाची बातमी :  'असा' आहे मुंबईमध्ये उभारला जाणारा बाळासाहेब ठाकरेंचा 9 फुटी पूर्णाकृती पुतळा..

तेजसा श्‍यामराव पायाळ (वय 29) हिचा मृतदेह सिंहगड रोड परिसरात सोमवारी (ता 2) आढळून आला होता. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांनी केलेल्या तपासात तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले झाले. या प्रकरणी पियुष नितीन संचेती (वय 34, रा. सहकारनगर, तुळशीबागवाले कॉलनी), वसंतकुमार प्रभाकर गौडा (वय 31, रा. बेंगलोर) आणि सोनल सुनील सदरे (वय 29, रा. आंबेगाव बुद्रुक) यांना अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सतिश उमरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

महत्त्वाची बातमी : काँग्रेसला मोठा झटका; स्पष्ट बहुमत असूनही गमावली सत्ता

पोलिसांनी तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी सहायक सरकारी वकील राजश्री कदम यांनी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. घटनेच्यास्थळी तिघे उपस्थित असल्याचे सीसीटीव्हीवरून निष्पन्न झाले आहे. तिघांकडून सांगण्यात येणाऱ्या कथनामध्ये विभिन्नता आहे. मयत तरूणीचा मोबाइल घटनास्थळी आढळून आलेला नाही. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो लपवून ठेवला असण्याची शक्‍यता आहे. घटनेनंतर फ्लॅटला कुलूप लावण्यात आले होते. चावीबाबत तपास करणे, मयताच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत. त्या कशाच्या सहाय्याने केल्या, याचा शोध घ्यायचा आहे. नक्की कोणत्या कारणासाठी हे कृत्य केले. त्यांनी एकत्र दारू, हुक्काचे सेवन केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दारू, हुक्का कोठून आणला, त्यांचे आणखी कोणी मित्र आहेत का, याबाबत तपास करण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी अॅड. कदम यांनी केली. ती न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपींना 10 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली. 

हेही वाचा - तानाजीच्या निमित्ताने सिंहगड चर्चे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com