
पुणे : लॉकडाऊनचा फटका आज प्रत्येक घटकाला बसतोय त्यापैकीच एक म्हणजे घरेलू कामगार महिला, खरंतर घरकाम आटोपणाऱ्या मावशी किंवा बाईमुळे नोकरी करणाऱ्या अनेक महिलांचं जीवन सुसह्य झालंय असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. मात्र, सध्या कोरोनामुळे अनेक सोसायट्यांनी या महिलांना प्रवेश बंद केला आहे, दुसरीकडे मार्च वगळता इतर महिन्यांचे पगारही दिले नाहीत. त्यामुळे या महिला अडचणीत सापडल्या आहेत.
सांगा, आम्ही जगायचं कसं हा आर्त सवाल आहे घरेलू कामगार महिलांचा आहे. लॉकडाऊनमुळे या महिला अडचणीत सापडल्या आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेशबंदी झालीय, त्याचा मोठा फटका या घरकाम करणाऱ्या महिलांना बसलाय.
मार्चमध्ये काम केल्याचा पगार त्यांना मिळालाय पण पुढे काय हा प्रश्न त्यांना सतावतोय. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता देशभरातील उद्योगधंदे बंद आहेत. अशावेळी कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळणाऱ्या घरोघरीच्या महिला कामगारांच्या अडचणी अधिक आहेत
लॉकडाऊनचा कालावधी वाढला तर संसार कसा चालवायचा याची चिंता सतावते आहे.
आमच्यासाठी ना कोणता कायदा आहे. ना कोणती नियमावली. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने मदत करावी.-रेखा कांबळे, घरकाम करणाऱ्या महिला
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
या घरेलू कामगार महिलांमुळे कोरोनाचा विषाणू पसरेल अशी भीती अनेकांना आहे. मात्र मुळात भारतात कोरोना हाच परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे आला आहे. त्यामुळे यांच्यामुळे कोरोना पसरतो हा समजच चुकीचा आहे. तसंच या महिलांच्या कामाबाबत सरकारी पातळीवरील आदेशात सध्या काहीही स्पष्टता नाही. याबाबत आम्ही पाठपुरावा करणार आहे.
-किरण मोघे, जनवादी महिला संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.