CoronaEffect : देहूतील तुकाराम महाराज मंदिर 23 पर्यंत बंद

Temple of Tukaram Maharaj in Dehu closed till 23rd due to corona
Temple of Tukaram Maharaj in Dehu closed till 23rd due to corona
Updated on

देहू(पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यातील दर्शन भाविकांना बंद करण्याचा निर्णय संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्त मंडळांनी मंगळवारी (ता.17) सकाळी घेतला. त्यामुळे 17 मार्च ते 23 मार्च या कालावधीत देऊळवाडा भाविकांना बंद राहणार आहे. मात्र, देऊळवाड्यात संस्थानच्यावतीने नित्यपुजा सुरु राहणार आहेत. त्यावेळेस भाविकांना प्रवेश देण्यात येणार नाही.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नुकताच संत तुकाराम महाराज बीज सोहळा येथे संपन्न झाला.राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी 20 ते 25 टक्क्यांनी कमी झाली होती. कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने योग्य पावले उचलेली आहेत.

Coronavirus: पुण्यात आजपासून तीन दिवस व्यापार बंद 

याबाबत संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे म्हणाले, कोरोनाबाबद काळजी घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जनतेला आव्हान केलेले आहे.त्यामुळे संस्थाननेही खबरदारी म्हणून येत्या 23 मार्चपर्यत देऊळवाडा,वैकुंठस्थान आणि संत तुकाराम महाराज जन्मस्थान येथील दर्शन भाविकांसाठी बंद केलेले आहे .देऊळवाड्यातील नित्यनियमित पुजा सुरु राहतील.भाविकांनी दर्शनासाठी आग्रह धरू नये.तसेच संस्थानला सहकार्य करावे. तसेच कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, अभिजित मोरे, विशाल मोरे, संतोष महाराज मोरे, संस्थानचे पुजारी धनजंय महाराज मोरे व इतर उपस्थित होते.

Coronavirus : राज्यात कोरोनाचा पहिला बळी मुंबईत!

देहूतील आठवड्यातून दोन वेळा भरणारा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी असलेला बाजार बंद करण्यात आला.व्यापाऱ्यांची त्यामुळे धांदल उडाली.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com