पुणे - नगर रस्त्यालगत भर रस्त्यावर टेम्पोने अचानक पेट घेतल्याने खळबळ

नितीन बारवकर
Tuesday, 1 December 2020

नगर रस्त्यालगत भर रस्त्यावर टेम्पोने अचानक पेट घेतल्याने खळबळ
शिरूर - शिरूर शहराबाहेरून जाणा-या (बायपास) पुणे - नगर रस्त्यालगत बो-हाडे मळ्याजवळ भर रस्त्यावर टेम्पोने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. हा पेटता टेम्पो रस्त्यातच आडवा झाल्याने सुमारे दीड तास या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

पुणे - नगर रस्त्यालगत भर रस्त्यावर टेम्पोने अचानक पेट घेतल्याने खळबळ
शिरूर - शिरूर शहराबाहेरून जाणा-या (बायपास) पुणे - नगर रस्त्यालगत बो-हाडे मळ्याजवळ भर रस्त्यावर टेम्पोने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. हा पेटता टेम्पो रस्त्यातच आडवा झाल्याने सुमारे दीड तास या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज (ता. १) सायंकाळी सातच्या सुमारास हा थरार घडला. औषधांची खोकी व बॅरल घेऊन हा टेम्पो  पुण्याच्या दिशेने चालला होता. शिरूर बायपासवरून मुख्य महामार्गावर येताच टेम्पोच्या पुढील बाजूने धूर येत असल्याचे जाणवल्याने चालकाने टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेतला व खाली उतरून बोनेट उघडले असता इंजिनमधील वायरिंगचे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे दिसताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, याच ठिकाणी थोडा उतार असल्याने टेम्पो मागे घरंगळत जाऊन दूभाजकावर आदळला. त्यावेळी टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे ज्वाळांनी वेढला होता. चालकाने पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने पाण्याचा मारा करून आग विझवली. त्यामुळे टेम्पोतील महागडी औषधे वाचली.

बॅकलाॅगची परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीनेच; गैरप्रकारांना बसणार आळा

दरम्यान, या अपघातानंतर शिरुर नजीक वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. टेम्पो पेटल्याच्या ठिकाणापासून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या होत्या. आग विझवल्यानंतर टेम्पो रस्त्यातून बाजूला घेण्यात आला. सुमारे दीड तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना बदल करण्यासाठी मुदत

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tempo Fire on pune nagar highway