बिबट्यासाठी पिंजरा ठरतोय तात्पुरता उपाय

अर्जुन शिंदे
गुरुवार, 30 जानेवारी 2020

पिंजरा मिळविण्यातही अडचणी
मुळातच बिबट्यांना पिंजऱ्यात पकडण्यासाठी वनविभागाला वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, बिबट्याचे हल्ले वाढल्यावर नागरिकांच्या समाधानासाठी वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले जातात. पिंजऱ्यात पकडलेल्या बिबट्यांना माणिकडोह येथील बिबट्याच्या निवारा केंद्रात हलवले जाते. या ठिकाणी बिबट्यांना ठेवण्यावर काही मर्यादा आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. हे चक्र अव्याहतपणे सुरू आहे. मात्र, पिंजऱ्यात पकडून दुसरीकडे काही अंतरावर सोडलेले बिबटे पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी परतू शकतात. एकदा पिंजऱ्यात पकडकलेला बिबट्या बऱ्याचदा पुन्हा दुसऱ्यांदा लवकर पिंजऱ्यात अडकत नाही. त्यामुळे वनविभागाची बऱ्याचदा अडचण होते.

आळेफाटा - बिबट्यांची संख्या वाढल्यावर मानवी जनजीवनावर ताण येणार आहे. बिबट्याचा अधिवास जसजसा नष्ट होत जाईल, तसतसा बिबट्या सैरभैर होऊ शकतो. मात्र, बिबट्याला पिंजऱ्यात पकडून दुसरीकडे नेऊन सोडणे, हे तात्पुरते ठीक आहे. मात्र, हा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. बिबट्यांच्या समस्येने गंभीर रूप धारण करण्यापूर्वीच वनविभागाने यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिबट्या हा कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणारा वन्यप्राणी आहे. त्याच्या कार्यक्षेत्रात नर- मादीच्या जोडी व्यतिरिक्त शक्‍यतो दुसरा बिबट्या प्रवेश करत नाही. पूर्ण वाढ झाल्यावर प्रजननक्षम नर बिबट्या स्वतःचे स्वतंत्र कार्यक्षेत्र निर्माण करतो. त्याच्या कार्यक्षेत्रात बिबट्याच्या नर- मादीसह बछड्यांचा वावर असतो. हे कार्यक्षेत्र परिस्थितीनुरूप सहा ते दहा किलोमीटरपर्यंतही असू शकते; पण बिबट्या त्याच्या कार्यक्षेत्रात दुसऱ्या नर बिबट्याचा सहजासहजी स्वीकार करत नाही. मात्र, एक बिबट्या पकडला की त्याची जागा दुसरा बिबट्या घेतो.

चाकणमध्ये कांदा २० रुपये किलो

त्यामुळे बिबट्याला पिंजऱ्यात पकडून दुसरीकडे नेऊन सोडणे, हे तात्पुरते ठीक आहे. मात्र, हा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही.

बारामती तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

बिबट्याच्या मानवावरील हल्ल्याच्या घटना वाढल्यानंतर पंधरा वर्षांपूर्वी वनविभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक अशोककुमार खडसे यांनी बिबट्यांना पिंजऱ्यात पकडून दूरवर नेऊन सोडण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविली होती. त्यानंतरच्या काळात बिबट्याची समस्या काही प्रमाणात कमी झाली. मात्र, अलीकडच्या काळात बिबट्याच्या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temporary solution to becoming a cage for leopard