पुणे जिल्ह्यात साडेदहा हजार कृषी पंपांना वीजेची प्रतिक्षा

Agriculture-Pump
Agriculture-Pump

लॉकडाउनमुळे अडथळा : येत्या मार्चपर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन
पुणे - जिल्ह्यातील दहा हजार ६७३ कृषी पंपांच्या वीज जोडण्या सुमारे वर्षभरापासून प्रलंबित राहिल्या आहेत. प्रारंभी निधीचा अभाव आणि आता लॉकडाउनचा अडथळा या जोडण्यांच्या विलंबास कारणीभूत ठरु लागला आहे. मात्र येत्या मार्च अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने या जोडण्या पुर्ण करण्याचे नियोजन महावितरण कंपनीने केले आहे. 

यानुसार प्रत्येक तीन महिन्यांचा एक टप्पा, याप्रमाणे चार टप्प्यात या सर्व कृषी पंपांना  वीज जोडण्या मिळू शकतील, असे महावितरण कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक दोन हजार ३५२ वीज जोडण्या या शिरूर तालुक्यातील तर, सर्वात कमी म्हणजे केवळ ९९ जोडण्या भोर तालुक्यातील प्रलंबित आहेत.

पुणे जिल्ह्यात महावितरण कंपनीचे दोन ग्रामीण मंडळ कार्यरत आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण आणि बारामती ग्रामीण मंडळाचा समावेश आहे. पुणे ग्रामीण मंडळात आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, हवेली आणि वेल्हे या सात आणि बारामती ग्रामीण मंडळात बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर आणि भोर या सहा तालुक्यांचा समावेश आहे.

प्रलंबित एकूण जोडण्यांपैकी बारामती मंडळातील सहा हजार २२२ तर, पुणे ग्रामीण मंडळातील चार हजार ४५१ जोडण्या आहेत. या सर्व जोडण्या पुर्ण करण्यासाठी महावितरण कंपनीला १८२ कोटी ७२ लाख पन्नास हजार रुपयांचा निधी लागणार आहे. 

मार्च २०१९ अखेर नऊ हजार ३६२ कृषी पंपांना वीज जोडणी हवी होती. त्यानंतर २०२० मध्ये आणखी एक हजार ३५२ शेतकऱ्यांनी जोडणीसाठी आवश्यक सुरक्षा अनामत  भरली आहे. या एकूण दहा हजार ७१४ पैकी मार्च २०२० अखेर  चार हजार २०१ पंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. यामुळे शिल्लक राहिलेल्या सहा हजार ४४० आणि नव्याने मागणी केलेल्या आणखी चार हजार २३३ अशा एकूण दहा हजार ६७३ जोडण्या प्रलंबित राहिल्या आहेत. 

टप्पानिहाय जोडण्या नियोजन 
- पहिला टप्पा (एप्रिल ते जून) --- २ हजार १०६.
- दुसरा टप्पा (जुलै ते सप्टेंबर) --- २ हजार २९५.
- तिसरा टप्पा (ऑक्टोबर ते डिसेंबर) --- २ हजार ९२४.
चौथा टप्पा (जानेवारी ते मार्च २०२१) --- ३ हजार ३४८.

तालुकानिहाय प्रलंबित वीज जोडण्या
- बारामती - ६४७, इंदापूर - ८५१, दौंड - १ हजार ७६१, शिरूर - २ हजार ३५२, पुरंदर -  ५९२, भोर - ९९, आंबेगाव - ७७०, जुन्नर - १ हजार ६२३, खेड - ८६६, मावळ - २५३, मुळशी - १६०, हवेली - ४५६ आणि वेल्हे - ३२३.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com