Otur Accident: ओतूर येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोन तरूण जागीच ठार

Otur Accident: ओतूर येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोन तरूण जागीच ठार

Accident: ओतूर गावच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावर कोळमाथा येथे एस.टी.बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरूण जागीच ठार झाले. तर एस टी बस मागील पिकअप पलटी झाला. हा अपघात शुक्रवारी ११ वाजे दरम्यान झाला.

दुचाकीवरील ऋषीकेश संदीप वायकर वय.२२ रा.येंधे हिवरे ता.जुन्नर,पुणे व ओंकार दत्तात्रय गाडेकर वय.२३ रा.घारगाव ता.संगमनेर,जि.अहमदनगर हे दोघे तरूण ठार झाले आहेत.

Otur Accident: ओतूर येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोन तरूण जागीच ठार
Accident : मोटारसायकलला अज्ञात वाहनाची धडक; अपघातात दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू

ठाणे - मेहकर ही एसटी बस भरधाव वेगात ओतूर कडून आळेफाट्या कडे जात होती.त्याच वेळी आळेफाट्या कडून ओतूर कडे दुचाकी येत होती.

कोळमाथा येथे एस टी बस ची व दुचाकीची धडक झाली यात दुचाकीवरील दोन्ही तरूण गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरीकांनी व पोलीसांनी उपचारासाठी आळेफाटा येथे पाठवले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Otur Accident: ओतूर येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोन तरूण जागीच ठार
Accidet News: खड्ड्याने घेतला आणखी एक बळी; दोन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव बांबळे,राजेंद्र बनकर,संतोष भोसले यांनी व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकांनी महामार्गावरील अपघातग्रस्त गाड्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.तसेच सर्व अपघाता ग्रस्त गाड्या पोलीस ठाण्याच्या आवारात नेण्यात आल्याने वाहतूक कोंडी सुटली.पुढिल तपास ओतूर पोलीस करीत आहे.

Otur Accident: ओतूर येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोन तरूण जागीच ठार
Nashik Fire Accident: गॅलरीत रॉकेट पडल्याने आग; भाऊबीजेला आलेल्या बहिणीचे कपडे व लॅपटॉप जळाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com