भयंकर, इंदापुरात पक्ष्यांचा होतोय तडफडून मृत्यू

डाॅ. संदेश शहा
Thursday, 28 May 2020

इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी येथे गेल्या दोन दिवसांपासून कोकीळ, चित्तूर, टिटवी, होला, मोर आदी पक्षी अचानक तडफडून मरण पावले आहेत.

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी येथे गेल्या दोन दिवसांपासून कोकीळ, चित्तूर, टिटवी, होला, मोर आदी पक्षी अचानक तडफडून मरण पावले आहेत. या पक्षांचा मृत्यू वाढत्या उन्हामुळे किंवा विषबाधेमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यासंदर्भात बापू श्रीरंग झगडे या पक्षीप्रेमीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

शेतकऱ्यांना रडवतोय कांदा, फुलांचाही वांदा...  
  
बापू झगडे यांच्या शेताजवळ गेल्या दोन दिवसांपासून पक्षी अचानक मरून पडू लागले आहेत. त्यातच 27 मे रोजी राष्ट्रीय पक्षी असलेला मोर देखील मृत्यूमुखी पडला. बापू यांच्या मुलाने पक्षांना पाणी पाजून देखील ते मरण पावले.

एसटीकडून प्रवासी नव्हे तर मालवाहतुकीसाठी जाहिराती   

राष्ट्रीय पक्षी मोर मरण पावल्यानंतर बापू याने थेट पोलिस ठाणे व वनखात्याशी संपर्क साधला.  
त्यानंतर वनरक्षक एस. व्ही. गीते, वन कर्मचारी बी. बी. वाघमोडे यांनी तातडीने झगडेवाडीस घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मोर पक्षी ताब्यात घेतला. या वेळी झगडेवाडीचे पोलीस पाटील संजय झगडे, पांडुरंग मोरे, संतोष मोरे आदी उपस्थित होते.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

झगडे म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून  कोकीळ, चिमणी, टिटवी, चित्तूर, मोर या पक्षांचे मुत्यू होत आहेत. या परिसरात गेल्या 13 वर्षांपासून मी राहत आहे, मात्र असा प्रकार प्रथमच घडला आहे. पक्षांचे मुत्यू विषबाधेतून होत असावेत, असा आपला अंदाज असून, याची चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrible, various birds are dying in Indapur taluka