दौंड तालुक्यात बिबट्याची दहशत; तीन मेंढयासह एक कोकरू ठार

बिबट्याने केलेल्या हल्यात तीन मेंढ्या आणि एक कोकराचा मृत्यू झाला. पाटेठाण परिसरात बिबट्याचा वावर परिसरात वाढल्याने मोठी दहशत निर्माण.
Sheep
SheepSakal

राहू - पाटेठाण (ता. दौंड) हद्दीत बुधवारी (ता. १) मध्यरात्रीच्या सुमारास हरगुडे (ता. दौंड) येथील वस्तीवर मेंढपाळ लक्ष्मण रामचंद्र घुले यांच्या वाडयावर बिबट्याने केलेल्या हल्यात तीन मेंढ्या आणि एक कोकराचा मृत्यू झाला. पाटेठाण परिसरात बिबट्याचा वावर परिसरात वाढल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी मेंढपाळ लक्ष्मण घुले यांच्या परिवारासह सामाजिक युवा कार्यकर्ते अमोल हंबीर यांनी केली आहे. घुले यांचा शेळ्या मेढ्यांचा वाडा चरण्यासाठी पाटेठाण येथील हरगुडेवस्ती परिसरात मुक्कामी होता. परिसरात बिबटयाचा वावर वाढलेला असून तातडीने पिंजरा लावून बिबटयाचा बंदोबस्त करण्याची मागणी पाटेठाणच्या सरपंच ज्योती यादव, विजय हंबीर, पाटील यादव, अमोल हंबीर यांच्यासह ग्रामस्थांनी केली.

वनविभागाच्या अधिका-यांनी मेंढ्यांचे शवविच्छेदन करून पुढील अहवाल वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबटयाने मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या वाघरीवरून उडी मारून शेळ्यांवर हल्ला करून मोकळ्या शेतात फरफटत नेले. परिसरातील अनेक कुत्र्यांवर हल्ले करून त्याने फडशा पाडला होता.

Sheep
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस; पाणीसाठ्यात किंचित वाढ

देवकरवाडी, मगरवाडी, दहिटणे, मिरवडी परिसरात उसाचे, वनविभागाचे अधिक क्षेत्र असल्याने बिबट्याला लपायला अधिक वाव मिळतो. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी शेतकरी शेतातील पीकांना पाणी द्यायला जात नसल्याची परस्थिती आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाता समुहाने जा, फटाके वाजवा, बॅटरीचा उजेड करा. बिबटया अचानक दिसल्यास पाठलाग करू नका. असे आवाहन वनविभागाच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले.

घुले परिवाराला फुटला अश्रूचा बांध...!

पावसामुळे आमच्या मेंढ्या थंडीने गारटल्या आहेत. त्यात काही मेंढ्या लंगडतही आहे. दोन दिवस थंड वातावरणामुळे मेंढ्या चारा खात नाही. अशा परिस्थितीमध्ये रात्री बिबट्याने केलेला हल्ल्यात आमचे मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाने पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. आमची आर्थिक खूपच हलाखीची आहे वनविभागाचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी आल्यावर माहिती विचारताना घुले यांच्या कुटूंबाला अश्रू आवरता आले नाही. हे बघा साहेब, आमंच लय मोठं नुकसान झालंय, तेवढं सायब पोटच्या पोरांबाळाप्रमाणे आम्ही शेळ्या, मेंढया जपल्या आहेत. आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळून द्या. अशी केविलवाणी विनंती करताना त्या कुटूंबाला हुंदके (रडू) आवरता येत नव्हते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com