TET Scam Case : तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांची 3 कोटी ६० लाखांची मालमत्ता जप्त

टीईटी गैरव्यवहार प्रकरण, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
tet scam case tukaram supe 3 cr 60 lakh property seized acb action pune marathi news
tet scam case tukaram supe 3 cr 60 lakh property seized acb action pune marathi newsesakal

Pune News : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांनी अवैध मार्गाने गोळा केलेली दोन कोटी ८८ लाखांची रोकड आणि १४५ तोळे सोन्याचे दागिने अशी सुमारे तीन कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केली आहे.

या प्रकरणी तुकाराम नामदेव सुपे (वय ५९, रा. कल्पतरू, गांगर्डे नगर, पिंपळे गुरव, पुणे) यांच्याविरुद्ध बुधवारी (ता. ६) सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चौकशी अधिकारी पोलिस निरीक्षक श्रीराम विष्णू शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

सुपे हे पुणे जिल्हा परिषदेत माध्यमिक विभागात शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते. परीक्षा परिषदेचे आयुक्त असताना २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहार समोर आला होता.

tet scam case tukaram supe 3 cr 60 lakh property seized acb action pune marathi news
Pune : नशीब बलवत्तर, ४० फुट खोल टाकीत पडलेल्या मुलीचे वाचवले प्राण; अग्निशामक दलाच्या जवानांच्या प्रयत्नांना यश

या प्रकरणी सुपे यांच्याविरुद्ध पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुपे यांच्याकडे लाखो रुपयांची रोकड आणि टीईटी परीक्षेसंदर्भातील कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली होती. या गुन्ह्यात त्यांना १६ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने सुपे यांना निलंबित केले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राकडून त्यांची चौकशी सुरू होती. १९८६ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत सुपे यांनी तीन कोटी ६० लाख रुपयांची संपत्ती गोळा केल्याचे चौकशीत समोर आले आहे.

tet scam case tukaram supe 3 cr 60 lakh property seized acb action pune marathi news
Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : ज्येष्ठ नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद

या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दोन कोटी ८८ लाखांची रोकड आणि ७२ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. भ्रष्ट मार्गाने धारण केलेली संपत्ती असून, ती त्यांच्या सेवा कालावधीतील वैध उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.

कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

- अमोल तांबे, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com