ठाकरे सरकार आज 'हा' मोठा निर्णय घेण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

दलबदलू व सारखेच पक्ष बदलणाऱ्यांना आळा बसविण्यासठी देशात पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला होता. आता हाच कायदा ग्रामपंचायत स्तरावर आणण्याचा विचार ठाकरे सरकार करत आहे. 

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार सध्या अॅक्टीव्ह मोडमध्ये आहे. सध्या ठाकरे सरकारने निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे. आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत आज मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. दलबदलू व सारखेच पक्ष बदलणाऱ्यांना आळा बसविण्यासठी देशात पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला होता. आता हाच कायदा ग्रामपंचायत स्तरावर आणण्याचा विचार ठाकरे सरकार करत आहे. 

Delhi Elections : दिल्लीत झालेल्या पराभवावर काँग्रेस म्हणते...

स्थानिक स्वराज्य संस्थाची सर्वात शेवटची पायरी म्हणजे ग्रामपंचायत स्तर होय. या स्तरावर देखील आता दलबदलूंना झटका देण्याचे काम ठाकरे सरकार करण्याच्या निर्णयाप्रत आहे. ग्रामपंचायत स्तरावर देखील दलबदलूंना चांगलाचा ऊत येतो. त्याचा प्रभाव गावातील विकासकामांवर होताे. याच कारणास्तव आता ठाकरे सरकार आता ग्रामपंचायत स्तरावर पक्षांतरबंदी कायदा आणण्याच्या मूडमध्ये आहे. 

त्याचप्रमाणे दुसरा एक मोठा निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. राज्यातील खेडेगावांना ठेवण्यात आलेली जातिवाचक नावं बदलण्याची चिन्हं आहेत. वस्त्या, वाड्यांना जातींवरुन ठेवलेली नावं रद्द करण्यासाठी ठाकरे सरकार पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. जातिवाचक नावं असलेल्या वाड्या-वस्त्यांना शाहूनगर, समतानगर, ज्योतीनगर अशी नावं ठेवण्याचा विचार आहे. सामाजिक न्याय विभाग यासंबंधी प्रस्ताव आणणार असल्याची माहिती आहे.

Delhi Election : 'आय लव्ह यू' म्हणत विजयानंतर केजरीवालांनी दिली 'ही' प्रतिक्रीया 

दरम्यान, दुपारी दोन वाजता मंत्रालयात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत निर्णय होण्याची चिन्हं आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी तसे संकेतही दिले होते. काळानुसार काही निर्णय घेण्याची गरज असते. यापुढे महाराष्ट्रात कुठेही जातीच्या नावाने वस्ती असायला नको, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याचं मुंडेंनी सांगितलं होतं.

Delhi Elections : दिल्लीत झालेल्या पराभवावर काँग्रेस म्हणते...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray government will introduce a new law at the Gram Panchayat level