''मी राजीनामा देतो, तुम्हीही द्या''

''मी राजीनामा देतो, तुम्हीही द्या''
Published on

मी राजीनामा देतो, तुम्हीही द्या

ठाण्याचे उपमहापौर पाटील यांचे शिवसेनेला आव्हान

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ठाणे महापालिकेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाद आणखी चिघळताना दिसत आहे. शिवसेनेच्या नगरसेविका आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी भाजपवर टीका केल्यानंतर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. “युतीमुळे भाजपचे नुकसान झाले. वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढलो. जर शिंदे सेनेच्या नगरसेवकांचे मत असेल की, आम्ही सत्तेतून बाहेर पडावे, तर मी राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या,” असे थेट आव्हान कृष्णा पाटील यांनी दिले.

ठाणे महापालिकेची निवडणूक जानेवारीत पार पडली. त्यानंतर झालेल्या चार सर्वसाधारण सभांमध्ये शिवसेना-भाजपमधील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. सभागृहात दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांत वारंवार वाद होत असून, चर्चा न करता अवघ्या काही मिनिटांत विषय मंजूर करण्यात येत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
---
‘पुन्हा जनतेच्या दरबारात जाऊया’
उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन शिंदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. “आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढलो. आता जर आम्हाला सत्तेतून बाहेर पडण्यास सांगितले जात असेल, तर पुन्हा जनतेच्या दरबारात जाऊया. जनता ठरवेल कोण सत्ताधारी असणार,” असा इशाराही कृष्णा पाटील यांनी दिला. तसेच ठाणेकरांच्या प्रश्नांवर भाजप बोलत राहील आणि गरज पडल्यास विरोधही करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com