esakal | गोंदियाच्या 36 तरुणी...अमोल कोल्हे यांनी केले असे काही... 
sakal

बोलून बातमी शोधा

dr Amol Kolhe

लॉकडाउनमुळे कंपनी बंद झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून शिरूर तालुक्‍यातील सणसवाडी येथे अडकून पडलेल्या गोंदिया जिल्ह्यातील 36 तरुणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे घरी रवाना झाल्या. 

गोंदियाच्या 36 तरुणी...अमोल कोल्हे यांनी केले असे काही... 

sakal_logo
By
शरद पाबळे

कोरेगाव भीमा (पुणे) : लॉकडाउनमुळे कंपनी बंद झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून शिरूर तालुक्‍यातील सणसवाडी येथे अडकून पडलेल्या गोंदिया जिल्ह्यातील 36 तरुणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे घरी रवाना झाल्या. 

पुणे जिल्ह्यात पाऊस पहा कोठे घालतोय थैमान...  

सणसवाडी येथील एका खासगी कंपनीत या सर्व तरुणी नोकरी करीत होत्या. मात्र, लॉकडाउन जाहीर झाल्यापासून त्यांची कंपनी बंद होती. तेव्हापासून या सर्व जणींना गोंदिया जिल्ह्यातील आपल्या घरी जाण्याची ओढ लागली होती. या तरुणींनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. खासदार पटेल यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पत्र पाठवून सहकार्य करण्याची विनंती केली. 

पुणेकरांनो, हा आलेख सांगतोय, पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे

डॉ. कोल्हे यांनी तत्काळ दखल घेऊन शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांच्याशी संपर्क साधून या सर्व 36 तरुणींना गोंदिया जिल्ह्यातील त्यांच्या घरी परत पाठविण्यासाठी परवानगी देऊन बसची व्यवस्था करण्याची सूचना केली. मोफत बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याने या तरुणींसमोर अडचणी उभ्या राहिल्या. डॉ. कोल्हे यांना ही बाब कळताच त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संपर्क साधून बसची व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर या सर्वजणी गोंदियाकडे रवाना झाल्या. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बस भाड्यासाठीही पैसे नव्हते... 
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मदतीमुळेच आम्हाला घरी परत जाता येत आहे, अन्यथा आमच्या जवळ बस भाडे देण्यासाठीही पैसे शिल्लक नव्हते. अशावेळी डॉ. कोल्हे आमच्या मदतीला धावून आले, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशा भावना या तरुणींनी व्यक्त केल्या. 


 

loading image