esakal | पलायन केलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पलायन केलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By
अमर परदेशी

वरवंड : यवत पोलिसांच्या ताब्यातुन पळुन गेलेल्या आरोपीला पकडण्यात पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व यवत पोलिस पथकाला अखेर यश आले. सात दिवसा नंतर आरोपी हाताला लागल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. आबासाहेब सुखदेव बाबुल असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला शनिवारी (ता.४) मध्यरात्री त्याच्या जळगाव जिल्ह्यातील मुळ गावी शिवरी येथुन एका बाजरीच्या शेतातुन ताब्यात घेतले. अशी माहीती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

यवत पोलिस ठाण्यात संबधीत आरोपी आबासाहेब बाबुल यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलिसांनी जळगाव मधुन त्याला अटक केली होती. मागील आठवडयात २८ आॅगस्टला यवत पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचारी दौंड न्यायालयातुन आरोपीला पोलिस यवत पोलिस ठाण्यात घेवुन जात होते. वरवंड हद्दीतील एका हाॅटेलमध्ये पोलिस नाष्टा व चहासाठी आरोपीला घेवुन थांबले होते. त्यावेळी आरोपीने मोठया शिताफिने पोलिसांच्या तावडीतुन पलायन केले. माहीती मिळताच पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलिस अधिकाऱी व पोलिस फौजफाटा घेवुन लोकांच्या सहकार्याने आरोपीचा शिवारातील उसाच्या शेतात शोध घेतला. मात्र,रात्रभरातील शोध मोहीमे नंतरही पोलिसांच्या पदरी निराशा पडली.

हेही वाचा: 'शिवसेनेसारख्या विश्वास घातक्यांसोबत आम्हाला काम करायचं नाही'

यवत पोलिस व पुणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची एकुण तीन पथके आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली होती. अखेर सात दिवसाच्या अथक प्रयत्ना नंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले. खबऱया मार्फत आरोपी जळगाव जिल्ह्यातील त्याच्या मुळ गावी शिवारी येथे असल्याची माहीती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी (ता.४) मध्यरात्री आरोपीला एका बाजरीच्या शेतातुन सापळा लावुन मोठया शिताफिने ताब्यात घेतले.

हेही वाचा: 'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महिलांवर हात उचलतात; मला अजून न्याय नाही मिळाला'

सहायक पोलिस निरीक्षक संदीप येळे,तुषार पंदारे,जनार्दन शेळके,मनिष ठिगळे,दत्तात्रेय खाडे,निलेश कदम,गुरु गायकवाड,सोमनाथ सुपेकर या पोलिसांनी ही कामगिरी बजावली. पळून गेल्याचा अतिरिक्त गुन्हा दाखल करून आरोपीला शनिवारी दुपारी दौंड न्यायालयात हजर करण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.

loading image
go to top