esakal | भैरवनाथ तळ्याभोवती बांधलेली सीमा भिंत अज्ञाताने पाडली

बोलून बातमी शोधा

The boundary wall built around Bhairavnath lake was demolished by unknown person
भैरवनाथ तळ्याभोवती बांधलेली सीमा भिंत अज्ञाताने पाडली
sakal_logo
By
टीम इसकाळ

वाघोली : भैरवनाथ तळ्याभोवती बांधलेली काही फूट सीमा भिंत अज्ञात नागरिकाने मध्यरात्री पाडली. गुरांना तळ्यात नेण्यासाठी ही भिंत पडल्याचे कळते. या विरोधात ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी व लोणीकंद पोलीस यांच्याकडे तक्रार दिली आहे.

सध्या भैरवनाथ तळ्याचा परिसर सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. हा स्पॉट वाघोली कराणसाठी विरंगुल्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. पी एम आर डी ए व ग्रामपंचायत निधीतून हे सुशोभीकरण सुरू आहे. ग्रामनिधीतून सीमा भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी माजी उपसरपंच व सदस्य रामकृष्ण सातव सातत्याने पाठपुरवठा करून लक्ष ठेवीत आहेत. या तळ्यात 12 महिने पाणी असते. या पाण्याचा उपयोग परिसरातील बोअरिंग, विहिरी याना होतो. त्याची खोली वाढविल्याने पाणी पातळी वाढली आहे. या तळयामुळे पूर्वी पाणी पुरवठा करणाऱ्या खारी विहरीलाही पाणी राहते. टंचाईच्या काळात ते उपयोगी येते.

हेही वाचा: दीड कोटी रुपये खर्चून बांधलेली मंडई उद्घाटनाअभावी पडून

दरम्यान, सीमा भिंतीचा काही भाग अज्ञात इसमाने पडल्याचे आज लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीने तक्रार अर्ज दिला. या कामा बाबत एकाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. या तक्रारदाराने केलेले आरोप खोटे आहे. उलट त्यानेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून गोठा बांधला आहे. तरी तळ्यातील पाणी वापरास त्याला मुभा दिली आहे. त्यानेच ही सीमाभिंत पडून शासकीय कामाचे नुकसान केले आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याने त्याला जीवे मारण्याची दिलेली धमकी खोटी असून ग्रामविकास अधिकारी यांनी त्याला पाहिले सुद्धा नाही. असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: ...अन् मध्यरात्री १२ वाजता उपलब्ध झाला ऑक्सिजन