Pune News : जून अखेर न्यायालयात आरोपपत्र दाखल होणार !

खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यासाठी प्रयत्न, कल्याणीनगर अपघात प्रकरण
Porsche Car
Porsche Car esakal

पुणे : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात आरोपींविरुद्ध जूनअखेर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. हा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्याची विनंती राज्य सरकारकडे केली जाणार आहे. याबाबत परवानगी मिळाल्यास ऑगस्ट अखेरपर्यंत निकाल लागेल, या दृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

Porsche Car
Palghar News: निळमाती घाटात सापडले २ दिवसांचे नवजात बालक, परिसरात खळबळ

कल्याणीनगर परिसरात रविवारी (ता. १९) भरधाव पोर्श मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने आयटी अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर दाखल आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. अजय तावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना अटक केली होती. अल्पवयीन आरोपीच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याच्या रक्ताचा नमुना बदलण्यात आला होता. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालने स्वत:च्या रक्ताचा नमुना दिल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर तिलाही अटक करण्यात आली.

Porsche Car
Dhule News: पुरवणी परीक्षेसाठी साडेपाच हजार विद्यार्थी! धुळे-नंदुरबारमधील दहावी, बारावी अनुत्तीर्णांची स्थिती; 16 जुलैपासून परीक्षा

अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास दिल्याप्रकरणी विशाल अग्रवाल आणि मद्य दिल्याप्रकरणी कोझी हॉटेलचे मालक नमन भुतडा, प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, ब्लॅक पबचा व्यवस्थापक सचिन सांगळे, जितेश शेवानी, जयेश बोनक अटकेत आहेत. तर, चालकाचे अपहरण करून त्याच्यावर दबाव टाकल्याप्रकरणी सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल याच्याविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल आहे.

Porsche Car
Dhule News: पाऊस तोंडावर, नाले मात्र ‘ब्लॉक’च! धुळे शहरातील काही नाल्यांची स्थिती; प्राधान्यक्रमाने नालेसफाईला वेग देण्याची गरज

या तीनही गुन्ह्यांतील तपास अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवण्यात येत आहे. न्यायालयात खटल्यास विलंब झाल्यास साक्षीदार आणि पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तांत्रिक पुराव्यांवर भर देण्यात येत आहे. तसेच, न्यायालयात लवकर आरोपपत्र दाखल करून हा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

त्या’ व्यक्तीचा खुलासा होणार!

अल्पवयीन आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले. त्यादिवशी ससून रूग्णालयात दोन आलिशान मोटारी आल्या होत्या. एका मोटारीतून शिवानी आणि सासरा सुरेंद्रकुमार अग्रवाल हे दोघे आले होते. या दुसऱ्या मोटारीतून आलेल्या व्यक्तीने घटकांबळेला पैसे दिल्याचे समोर आले आहे. येत्या दोन दिवसांत ‘त्या’ व्यक्तीचा खुलासा होण्याची शक्यता आहे, असे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com