Dhule News: पाऊस तोंडावर, नाले मात्र ‘ब्लॉक’च! धुळे शहरातील काही नाल्यांची स्थिती; प्राधान्यक्रमाने नालेसफाईला वेग देण्याची गरज

Dhule News : अद्यापही अनेक भागांतील नाल्यांची साफसफाई झाली नसल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे नालेसफाईचे हे काम कधी पूर्ण होईल, असा प्रश्‍न आहे.
Daithankarnagar, Chitod Road Beside Crematorium, Tiranga Chowk Near Poonam Tower, Z. B. Current status of drains near Patil College.
Daithankarnagar, Chitod Road Beside Crematorium, Tiranga Chowk Near Poonam Tower, Z. B. Current status of drains near Patil College.esakal

Dhule News : पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईच्या कामाला यंदा एप्रिलअखेरच सुरवात करण्यात आली. त्यामुळे या कामाला आता साधारण महिना लोटला. आता पावसाळा तोंडावर आहे. मात्र, अद्यापही अनेक भागांतील नाल्यांची साफसफाई झाली नसल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे नालेसफाईचे हे काम कधी पूर्ण होईल, असा प्रश्‍न आहे. (Dhule Status of drains in city)

दर वर्षी महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास नाले तुंबून शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये, नुकसान होऊ नये यासाठी ही उपाययोजना केली जाते. सप्टेंबर-२०२२ मध्ये धुळ्यात प्रचंड पाऊस झाल्याने नदी, नाला काठावरील अनेक वस्त्यांसह इतरही भागात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते.

त्या वेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेवर याचे खापर फोडले होते. त्यामुळे महापालिका यंत्रणेची नाचक्की झाली होती. नंतर महापालिका प्रशासनाकडून नालाकाठावरील अतिक्रमणांवर याचे खापर फोडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती.

ही पार्श्वभूमी लक्षात घेता व या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज असताना महापालिकेकडून शहरातील नालेसफाईला पाहिजे तसा वेग मिळालेला नसल्याचे दिसते. नालेसफाईचे काम सुरू करतेवेळी अधिकाऱ्यांनी यंदा शंभर टक्के नालेसफाईचे लक्ष्य असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप तरी तशी स्थिती पाहायला मिळत नाही. (latest marathi news)

Daithankarnagar, Chitod Road Beside Crematorium, Tiranga Chowk Near Poonam Tower, Z. B. Current status of drains near Patil College.
Nashik News : आपत्ती निवारणासाठी 166 कोटींचे प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

काही नाले ‘जैसे थे’

धुळे शहरात प्रमुख पाच-सात नाले आहेत. याशिवाय इतर छोटे-मोठे नाले तसेच हद्दवाढ क्षेत्रातही नाले आहेत. विशेषतः धुळे शहरातील प्रमुख नाल्यांची साफसफाई महत्त्वाची आहे. यातील काही नाल्यांची काही भागात साफसफाई झाली मात्र, काही ठिकाणी अद्यापही ‘जैसे थे’ स्थिती आहे.

त्यामुळे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत, झाडेझुडपे, कचरा तसाच पडून आहे. त्यामुळे हे नाले ब्लॉक असल्यागत स्थिती आहे. वलवाडी शिवारातील दैठणकरनगर येथील नाल्यात मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे तशीच आहेत. मागील वर्षी या भागात घरांमध्ये पाणी शिरले होते.

याशिवाय शहरातील झेड. बी. पाटील महाविद्यालयाजवळील नाला, हमाल-मापाडी परिसरातील नाला, तिरंगा चौक परिसरातील नाला, मिल परिसरातील स्मशानभूमीलगतचा नाला, मोती नाला आदी विविध भागातील नाल्यांची युद्धपातळीवर साफसफाई गरजेची आहे. याशिवाय काही भागात नालाकाठावरील अतिक्रमणाचा प्रश्‍नही कायम आहे.

नियोजनपूर्वक काम हवे

जेसीबी, पोकलेन मशिनद्वारे महापालिकेकडून नालेसफाईचे काम सुरू आहे. दैनंदिन भाडेतत्त्वावर ही मशिनरी वापरण्यात येत आहे. मागील वर्षी नालेसफाईसाठी २५ लाखांची तरतूद होती. यंदाही तेवढीच असल्याचे प्रारंभी अधिकारी म्हणत होते. मात्र, या वर्षी त्यापेक्षा जास्त तरतूद असल्याचे सांगितले जाते. आता पावसाळा तोंडावर असल्याने नियोजनपूर्वक नालेसफाईला गती देण्याची आवश्‍यकता आहे.

Daithankarnagar, Chitod Road Beside Crematorium, Tiranga Chowk Near Poonam Tower, Z. B. Current status of drains near Patil College.
Dhule Lok Sabha: मतमोजणीची प्रक्रिया 17 फेऱ्यांत होणार पूर्ण! प्रशासन सज्ज; विधानसभा क्षेत्रनिहाय 20 टेबलांवर होणार मतमोजणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com