Dhule News: पुरवणी परीक्षेसाठी साडेपाच हजार विद्यार्थी! धुळे-नंदुरबारमधील दहावी, बारावी अनुत्तीर्णांची स्थिती; 16 जुलैपासून परीक्षा

Nandurbar News : दहावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट व बारावीची पुरवणी परीक्षा १६ ते ३० जुलैदरम्यान होणार आहे
Exam
Examesakal

Dhule News : दहावी-बारावी परीक्षांचा नुकताच निकाल जाहीर झाला. त्यात नाशिक विभागातून तब्बल वीस हजारांवर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील साडेपाच हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगेचच उत्तीर्ण होण्याची संधी आहे.

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, १६ जुलैपासून या परीक्षा सुरू होतील. दहावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट व बारावीची पुरवणी परीक्षा १६ ते ३० जुलैदरम्यान होणार आहे. (Dhule Five half thousand students for supplementary examination)

प्रथम बारावी व त्यानंतर दहावीच्या नियमित परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले, पुनर्परीक्षार्थी, खासगी आणि श्रेणीसुधार योजनेतील विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेला प्रविष्ट होण्याची संधी आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ ते ३० जुलै व बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत होईल.

बारावीची माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा ७ व ८ ऑगस्टला होणार आहे. दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.

छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, तसेच व्हॉट्सॲप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशी सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे.

सोपा अभ्यासक्रम

स्पर्धेच्या युगात दहावी, बारावीची परीक्षा प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी नाराज होऊन शाळाबाह्य होण्याची भीती असते. त्यावर सोप्या अभ्यासक्रमाचा उपाय शोधण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अनुत्तीर्णांसाठी हा सोपा अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेला बसणाऱ्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (latest marathi news)

Exam
Dhule Lok Sabha: मतमोजणीची प्रक्रिया 17 फेऱ्यांत होणार पूर्ण! प्रशासन सज्ज; विधानसभा क्षेत्रनिहाय 20 टेबलांवर होणार मतमोजणी

साडेपाच हजार अनुत्तीर्ण

नाशिक विभागात दहावीचे दहा हजार २३१ व बारावीचे दहा हजार २७५ असे एकूण २० हजार ५०६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. यात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बारावीच्या दोन हजार ७९७ व दहावीच्या दोन हजार ७३० असे एकूण पाच हजार ५२७ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान,

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी तयार करण्याचे निर्देश परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी सर्व शिक्षणाधिकारी व डायट प्राचार्यांना दिले आहेत.

धुळे-नंदुरबारमधील अनुत्तीर्ण विद्यार्थी

तालुका...बारावी...दहावी

-धुळे...६५१...५५२

-साक्री...२४३...३३०

-शिरपूर... १२४...१७५

-शिंदखेडा...३०४...३००

-धुळे शहर...३६४...३८३

-अक्कलकुवा...१५०...१६१

-धडगाव...०३९...०९७

-नंदुरबार...२७८...२३७

-नवापूर...११४...११२

-शहादा...२८८...२१९

-तळोदा...२४२...१६४

-एकूण...२,७९७...२,७३०

Exam
Dhule News: पाऊस तोंडावर, नाले मात्र ‘ब्लॉक’च! धुळे शहरातील काही नाल्यांची स्थिती; प्राधान्यक्रमाने नालेसफाईला वेग देण्याची गरज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com