esakal | बेड मिळेना म्हणून पुण्याच्या रुग्णाने रात्रीत गाठली सांगली

बोलून बातमी शोधा

corona bed
बेड मिळेना म्हणून पुण्याच्या रुग्णाने रात्रीत गाठली सांगली
sakal_logo
By
जितेंद्र मैड

कोथरूड : पुणे तिथे काय उणे म्हणणा-या पुणेकरांवर ऑक्सीजन बेड उपलब्ध नसल्याने काय उपद्याप करावे लागतात हे दर्शवणारी एक घटना नुकतीच निदर्शनास आली. कोथरुडमधील मंत्री पार्क या सोसायटीत राहणाऱ्या एका रहिवाश्याच्या पत्नीला कोविड तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर स्थानिक डॉक्टरांचे उपचार सुरु होते. गृह विलगीकरणात असलेल्या या महिलेला काही दिवसांनी अचानक त्रास वाढला.

हेही वाचा: ऑक्सिजन बेड उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरु : चंद्रकांत पाटील

रुग्णालयात दाखल करण्याची तातडीची गरज भासू लागली. परिस्थितीची जाणीव होताच चिंताग्रस्त पतीने बुधवारी रात्री कोथरूड मधील सर्वच लहान मोठ्या रुग्णालयात जीवाच्या आकांताने बेड मिळविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. परंतु प्रत्येक ठिकाणी “आमच्याकडे खाटा उपलब्ध नाहीत” असे ठोकळेबाज उत्तर देऊन बोळवण करण्यात आली.

 रात्रभर वेगवेगळ्या रुग्णालयात खेटे मारून निराशा पदरी पडलेल्या या गृहस्थांनी शेवटी पत्नीला आपल्या  खाजगी वाहनात बसवून भरधाव  वेगाने कोठेही न थांबता सांगलीचा आपल्या जन्मगावाचा रस्ता धरला व दुसर्या दिवशी सकाळी तेथील विवेकानंद रुग्णालयात दाखल करून  ताबडतोब उपचाराला सुरुवात केली.

हेही वाचा: कोथरूड मधील प्रस्तावित लसीकरण केंद्र सुरू करा

सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य हरीश जोशी  म्हणाले की, “ आज त्यांच्या पत्नीला ऑक्सिजन ची सोय असलेल्या विभागात योग्य उपचार होत आहेत ही समाधानाची बाब असली तरी ही प्रातिनिधिक घटना आज पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचे निघालेले धिंडवडे अक्षरशः वेशीवर टांगणारी असून ,  सामान्य माणसाची हतबलता त्यातून दिसते.

टटव्ही.आय.पी. मंडळींचा आणि सामान्य माणसाचा करोना यातील उपचारात जमीन अस्मानाचा फरक आहे हे यातून अधोरेखित होते. या गृहस्थांनी प्रसंगावधान दाखवून पेशंटला घेऊन तत्काळ स्वतःच्या वाहनातून दुसऱ्या गावचा रस्ता धरला व आपल्या पत्नीला योग्य उपचार वेळेत सुरु केले ,परंतु हे प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाला शक्य नाही. अशा अनेक घटना रोज घडत असतील याची आतातरी शासकीय व महापालिका स्तरावर नोंद घेऊन नागरिकांचे हाल कमी करण्यासाठी तत्पर पावले उचलण्यात येतील'' अशी पुणेकरांची अपेक्षा आहे.

हेही वाचा: पुन्हा ई-पास! दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पासची यंत्रणा लागू