Lonikand : नियम न पाळणाऱ्या खाण व क्रशरचा ना हरकत प्रमाणपत्र रद्द होणार ; लोणीकंदच्या विशेष ग्रामसभेत निर्णय

धूळ न रोखणाऱ्या खाण व क्रशरचा ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय लोणीकंदच्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच नियम मोडणाऱ्यांवर दंड आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला.
Lonikand
Lonikandsakal

वाघोली : धूळ न रोखणाऱ्या खाण व क्रशरचा ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय लोणीकंदच्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच नियम मोडणाऱ्यांवर दंड आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला.

लोणीकंद येथील खाण व क्रशर उद्योगापासून निर्माण होणाऱ्या धुळीने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्ता खोदून ही वाहतूक रोखत काही दिवसापूर्वी आंदोलन केले होते. खाण व क्रशर उद्योगाला नोटीस द्वारे नियम पाळण्याबाबत ग्रामपंचायतीने सूचना दिल्या होत्या. मात्र धुळीचे प्रमाण कमी होतच नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. याबाबत ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली होती.

Lonikand
Pune Market Yard : ‘त्या’ डमी अडत्यावर कायमस्वरूपी बंदी; नियम मोडल्यास कारवाईचा बाजार समितीचा इशारा

या ग्रामसभेत या उद्योगांना नियम व अटी घालून देण्यात आल्या. जो या नियम व अटी पाळणार नाही त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे. नियम पाळले जातात की नाही हे पाहण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती या सर्व नियम अटी पाळल्या जातात की नाही याची पाहणी करणार आहे. या ग्रामसभेला जिल्हा बँक संचालक प्रदीप कंद, रवींद्र कंद नारायण कंद, अनिल होले, उत्तमराव भोंडवे, सरपंच प्रियांका झुरुंगे, उपसरपंच राहुल शिंदे, ग्रामसेवक जे एच बोरावणे सर्व ग्रामपंचायत सदस्य व १०० पेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

असे असतील नियम व अटी

  • * वाहतूक करताना डंपर मधील खडी ताडपत्रीने झाकलेली असावी.

  • * सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत उत्खनन करणे.

  • * डंपरच्या क्षमते एवढीच खड़ी असावी.

  • * क्रशरच्या परीसरात सतत पाणी मारावे.

  • * रात्रीच्या वेळी क्रशर सुरू ठेवू नये.

  • * वाहतुकीचे सर्व नियम पाळून वाहतूक करावी.

-नीलेश कांकरीया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com