esakal | आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा कहर; प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न

बोलून बातमी शोधा

covid19

आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा कहर; प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न

sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : आंबेगाव तालुक्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा वाढता आलेख कमी होत नसल्याने रुग्ण व नातेवाईकाच्या चिंतेत भर पडली आहे. तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने संपुर्ण वर्षभरात आता दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. मंगळवारी (ता. २७) रोजी 163 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना युद्ध पातळीवर सुरु आहेत. प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची साखळी तुटत नाही. सद्यस्थितीमध्ये ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर्ससाठी रुग्ण व नातेवाईकांची सर्वत्र धावपळ सुरू आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयाला दररोज १० ते १२, व मंचरच्या खाजगी ६ हॉस्पिटलमध्ये २५ ते ३० रूग्णाकडून ऑक्सिजन बेडची विचारणा केली जात आहे. पण ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची निराशा होते. बेडसाठी अन्य ठिकाणी धावपळ करावी लागते.

हेही वाचा: पुणे महापालिकेकडून १९ दिवसांत २५ लाखाचा दंड वसूल

गावाचे नाव व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या :मंचर ३३, अवसरी खुर्द ९, घोडेगाव, पोखरी, कानसे प्रत्येकी ८, पारगाव ७, पिपळगाव, साकोरे प्रत्येकी ६, शिनोली ५, अवसरी बुद्रुक, चांडोली, कोळवाडी प्रत्येकी ४, पेठ, काळेवाडी, दरेकररवाडी, जारकरवाडी, कुशिरे, गावडेवाडी, विठ्ठलवाडी येथे प्रत्येकी ३, कुरवंडी, शिगवे, कळंब, भावडी, गंगापुर बुद्रुक, वडगाव पीर, महाळुंगे सुपेधर, लाखणगाव, रांजणी, भावडी येथे प्रत्येकी २, पिंपळगाव घोडे, लांडेवाडी, निरगुडसर, वळती, धामणी, काठापुर, चिचोली, जांभोरी, चास, पिंगळवाडी, गिरवली, शिंदेवाडी, वडगाव काशिबेग, देवगाव, शेवाळवाडी, साल, सुपेधर, डिभे खुर्द, भीमाशंकर, लोणी, नागापुर, खडकवाडी, कोलतावडे, नांदुर, पिंपळगाव खडकी येथे प्रत्येकी एक. आंबेगाव तालुक्यात एकूण रुग्णसंख्या १० हजार ३१ झाली असून, ८ हजार ४९१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यत एकुण १४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी लागू केलेले निर्बंध काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. प्रत्येक कुटुंबाने काळजी घेतल्यास संसर्ग कमी होऊन रुग्णालयावर येणारा ताण आपोआप कमी होण्यास मदत होईल. अन्य तालुक्यांच्या तुलनेत आंबेगाव तालुक्यात कोविड उपचार सुविधा उत्तम आहे.-संजय गवारी, सभापती आंबेगाव तालुका पंचायत समिती

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर