
मायकल हा त्याच्या ओळखीच्या लोकांकडे ऊसने पैसे मागत असे. लोकांनी त्यास पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तो त्यांना चोरीची दुचाकी तारण ठेवत असे.
पुणे : केवळ मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या एका सराईत वाहन चोरट्यास सिंहगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ओळखीच्या लोकांकडून ऊसने पैसे घेऊन, त्या बदल्यात तारण म्हणून चोरीच्या गाड्या देऊन चोरटा मोकळा होत असे. मिळालेल्या पैशातुनच मौजमजा करण्याचा छंद त्यास होता. पोलिसांनी त्याच्याकडन पावणे दोन लाख रुपये किंमतीच्या सात दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
मराठ्यांच्या ध्येयाचा पानिपतमध्ये विजय
महेश ऊर्फ मायकल नवनाथ कांबळे (वय 25, रा. थिटे वस्ती, खराडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पोलिस ठाण्याचे एक पथक वाहनचोरीवर प्रतिबंध करण्यासाठी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांकडून काही वाहनांची तपासणी केली जात होती. तेव्हा नवले पुलाकडून आलेल्या एका तरुणाची मोपेड दुचाकी पोलिसांनी अडविली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली, त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा त्याच्याकडील दुचाकी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याची सखोल चौकशी केल्यानंतर तो सराईत वाहनचोर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध वाहनचोरीचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. मायकल हा सराईत वाहनचोर असून त्याच्याविरुद्ध सिंहगड, चंदननगर, लष्कर, अहमदनगरमधील तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये वाहनचोरीचे गुन्हे दाकल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.
आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही
असा विकायचा मायकल चोरी केलेली वाहने !
मायकल हा त्याच्या ओळखीच्या लोकांकडे ऊसने पैसे मागत असे. लोकांनी त्यास पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तो त्यांना चोरीची दुचाकी तारण ठेवत असे. त्यामुळे ओळखीच्या व्यक्ती त्याने ठेवलेल्या दुचाकीमुळे पाच ते दहा हजार रुपये त्याला देत असे. पैसे घेतल्यानंतर मायकल पुन्हा त्या व्यक्तीकडे गाडी घेण्यासाठी जात नव्हता. लोकांकडून घेतलेल्या पैशांचा वापर तो मौजमजेसाठी करत असे.