'या' कारणामुळेच भडकली कोरेगाव-भीमा दंगल!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 December 2019

भीमा- कोरेगाव दंगल हा एल्गार परिषदेचा दुष्परिणाम असून सीबीआयची पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे त्यात निष्पन्न झाले होते, असे याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन दोषारोप पत्रांमध्ये नमूद आहे.

पुणे : वरावरा राव आणि ऍड. सुरेंद्र गडलिंग यांनी सीपीआय (माओवादी) संघटनेतील भूमिगत सदस्यांना दिलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलावर विविध ठिकाणी हल्ले करण्यात आले. तर रोना विल्सन आणि ऍड. गडलिंग यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या डेडामधीन देशाचे स्थैर्य धोक्‍यात आणण्याच्या दृष्टीने व सामाजिक स्वास्थ बिघडून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचे निर्णय सीपीआयच्या ईस्टर्न रिजनल ब्युरोच्या बैठकीत झाले होते, अशी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशविरोधी कारवाया करण्यासाठी लागणारे शस्त्रासे व दारूगोळा खर करण्यासाठी मदत करणारा बसंता हा नेपाळमधील माओवादी संघटनेचा वरिष्ठ नेता आहे. तो राव यांच्या संपर्कात होता. आरोपी हे सीपीआयचा महासचिव मुपल्ला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती ऊर्फ जी. एस. ऊर्फ कॉ. जी. याच्या संपर्कात राहून संघटनेची उद्घिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत. तर राव हे सीपीआयसाठी निधी उभारणे, तो पुरविणे व त्याचे वितरण करण्याचे काम करीत आहे, असे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा प्रकरण : संशयितांवर होणार आरोप निश्चिती

दलित समाज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राम्हण केंद्रित अजेंडाच्या विरोधात गेला आहे. त्यांच्यातील असंतोषाचे भांडवल करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर गोंधळ घडवून आणण्याचे सीपीआय या माओवादी संघटनेचे काम एल्गार परिषदेच्य्या माध्यमातून आरोपींना केले आहे. भीमा- कोरेगाव दंगल हा एल्गार परिषदेचा दुष्परिणाम असून सीबीआयची पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे त्यात निष्पन्न झाले होते, असे याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन दोषारोप पत्रांमध्ये नमूद आहे.

'यांनी' रचला होता पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there are some reasons behind Koregaon Bhima riots