अरेरे! पुण्यातील या ठिकाणी कोरोना तपासणीची सोय नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कोरोना तपासणीची सोय नाही. त्यासाठी धायरी व वडगाव येथील रुग्णालयांत जावे लागते. मात्र, त्याठिकाणी एका दिवसात केवळ ५० जणांचे स्वॅब घेतले जातात. परिणामी, इतर संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी उशीर लागतो. त्यामुळे वारजे-कर्वेनगर भागातच तपासणी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

वारजे - वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कोरोना तपासणीची सोय नाही. त्यासाठी धायरी व वडगाव येथील रुग्णालयांत जावे लागते. मात्र, त्याठिकाणी एका दिवसात केवळ ५० जणांचे स्वॅब घेतले जातात. परिणामी, इतर संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी उशीर लागतो. त्यामुळे वारजे-कर्वेनगर भागातच तपासणी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १३, ३१ आणि ३२ यामध्ये सुमारे २ लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. आत्तापर्यंत २५९ जणांना संसर्ग झाला आहे. 

या भागातील रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील नातेवाइकांची तपासणी धायरी येथील लायगुडे हॉस्पिटल व वडगाव येथील सिंहगड हॉस्पिटल येथे करण्यात येते. या केंद्रांमध्ये दररोज मिळून केवळ ५० जणांची तपासणी केली जाते. त्यामुळे इतर संशयितांना ३ ते ४ दिवस वाट पाहावी लागत आहे. 

अजितदादांकडून पवारसाहेबांसमोरच भाजपच्या महापौरांचे कौतुक...  

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता वेळेत तपासणी न झाल्यास संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोथरूड, कर्वेनगर, वारजे, माळवाडी, शिवणे, उत्तमनगर परिसरासाठी वारजे-कर्वेनगर भागामध्ये स्वतंत्र कोरोना तपासणी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वृषाली चौधरी यांनी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्‍त संतोष वारुळे यांच्याकडे केली आहे. तसेच, यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा झाली असल्याचेही महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले.

शरद पवारांनी खडसावल्यानंतर अजित पवार म्हणाले...

हवेलीत १९ जणांना संसर्ग
किरकटवाडी/खडकवासला - हवेली तालुक्‍यातील गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवार (ता. २४) १९ नवीन रुग्णांची भर पडली असून, तालुक्‍याची एकूण संख्या २३९ झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली. 

तालुक्‍यामध्ये सध्या ९७ जणांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत १३७ रुग्ण बरे झाले आहेत, तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘लक्षणे दिसल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खरात व गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी केले आहे.

कोंढवे धावडेत दोन रुग्ण
कोंढवे-धावडेत दोन रुग्ण आढळले आहेत. गावाची ग्रीन झोनकडे वाटचाल सुरू असताना नव्याने रुग्ण आढळल्याने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला असल्याचे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no corona inspection facility at this place in Pune