अंबिल ओढा साफ झाल्याचा महापालिकेचा दावा; पावसाळ्यात होईल सिध्द

There is no danger from canal and drainage in the rainy season assured pune Municipal Corporation
There is no danger from canal and drainage in the rainy season assured pune Municipal Corporation
Updated on

पावसाळा आला की महापालिकेच्या नाला सफाई, पावसाळी गटारे स्वच्छ करणे, गाळ काढणे, आदी कामांच्या निविदा निघतात. यंदाही बहुतेक कामे पूर्ण झाली आहेत, असा महापालिकेचा दावा आहे. पण येणारा पावसाळाच तो सिद्ध करेल.

पुण्याच्या इतिहासातील ;ती' काळी तारीख...
अंबिल ओढ्यासह लोकवस्त्यांमधून वाहणारे ओढे-नाले, कालव्यातील गाळ काढतानाच त्यांची आवश्‍यक तेवढी दुरुस्ती केल्याचा दावा महापालिकेने शनिवारी केला. परिणामी, या कामांमुळे हेही महापालिका प्रशासनाने आर्वजून स्पष्ट केले आहे. त्यामुळे 34 किलोमीटर लांबीचे ओढ-नाले सुरक्षित झाल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, पावसाळी पूर्व कामांचा वेग वाढवून एकूण कामांपैकी 80 टक्के देखभाल-दुरुस्ती पूर्ण केल्याचे महापालिकेने प्रशासनाने दाखविले आहे.
पुण्यात जेव्हा 400 वाहने पाण्याखाली जातात तेव्हा... 
पावसाळ्यात गेल्या वर्षी पूरस्थिती निर्माण शहराच्या दक्षिण भागातील रहिवाशांचे नुकसान झाले. त्यात जीवित आणि वित्तहानी झाल्याच्याही घटना घडल्या. पुण्यात पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणातील पूरस्थितीने पुणेकरांत तेव्हा प्रचंड भीती निर्माण झाली. या पार्श्‍वभूमीवर पुणेकरांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आखून त्याची पावसाळयाआधीच अंमलबजावणी केल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढला तरी, पूरस्थिती टळण्याची शक्‍यता आहे.
...तरच पुण्यात यंदा पुराचा धोका टळता येऊ शकतो
त्यादृष्टीने अंबिल ओढा आणि पाऊंजाई ओढ्यातील गाळ, कचरा आणि त्यालगतच्या गटारांची दुरुस्त करण्यात आली आहे. त्याशिवाय, ओढ्यालगत टाकण्यात आलेला राडारोडाही उचलण्यात आला आहे.त्यामुळे ओढ्याच्या प्रवाहात अडथळे राहणार नाहीत आणि पाणी तुंबणार नाही, याअनुषंगाने कामे झाली आहे. काही कामे सुरू असून, पुढच्या पंधरा दिवसांत तीही पूर्ण केली जातील, असे महापालिकेतील अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी सांगितले.

झालेली कामे
ओढ्या-नाल्यातील राडारोडा उचलणे
-कचरा काढणे,
-जलवाहिन्या, गटार, त्यावरील झाकणांची दुरुस्ती
-280 कल्व्हर्टची दुरुस्ती 

200 किलोमीटरची गटारे झाली साफ

पावसाच्या पाण्याचा निचरा होऊन रस्ते नागरिक आणि वाहनांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित राहावेत, यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या आहेत. विविध भागांतील सुमारे दोनशे किलोमीटर लांबीची पावसाळी गटारांची सफाई करण्यात आली असून, त्यावरील 20 हजार झाकणांमधील (चेंबर) गाळ काढण्यात आला आहे.

पावासाळ्यात रस्त्यांवर साचणार नाही आणि पादचारी, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, याकरिता पावसाळी गटारे बांधण्यात आली असून, मात्र, गेल्या काही वर्षात त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत; तर रस्त्यांवरचे पाणी त्यालगतची घरे, दुकानांत शितल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून महापालिकेने यंदा बहुतांशी भागांतील पावसाळी गटारे दुरुस्ती करून वेगाने पाण्याचा निचरा होईल, याची व्यवस्था केली आहे.

शहरातील रस्त्यांची लांबी- 1 हजार 800 किलोमीटर
पावसाळी गटारे - 165 किलोमीटर
पावसाळी गटारांचा आकार - 600 आणि 900 मिलिमीटर
गटारांवरील चेंबर्स - 24 हजार


दुरुस्तीची कामे
पावसाळी गटारे 190 किलोमीटर
चेबर्स 19 हजार 500

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com