तांदळाच्या उत्पादनाबाबत महत्वाची बातमी; वाचा सविस्तर

प्रविण डोके
Sunday, 11 October 2020

-यंदा तांदळाच्या निर्यातीचा होणार विक्रम
-उत्पादन वाढल्याने 140 लाख टनापर्यंत होणार निर्यात

मार्केटयार्ड : यंदा देशात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. परिणामी चालू वर्षात भारतातून तब्बल 140 लाख टन तांदळाची निर्यात होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ही निर्यात उच्चांकी असणार आहे. मागील वर्षी साधारणतः 95 लाख टनाची निर्यात झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साधारणतः 40 ते 45 लाख टनाची भर पडणार आहे. त्यामुळे यंदा तांदळाच्या निर्यातीचा विक्रम होणार असल्याचा अंदाज तांदळाचे व्यापारी व फामचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी व्यक्त केला आहे.

आईसोबत बोलत थांबलेल्या तरुणावर हल्ला; तिघांनी लोखंडी सळईने केले वार​

यंदा चांगल्या पावसामुळे बासमती तसेच इतर प्रकारच्या तांदळाचे उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे यावेळी तांदूळ निर्यातीत देशाचा पहिला क्रमांक असणार आहे. इतर वेळी तांदूळ निर्यातीत भारत तिसर्‍या स्थानावर असतो. थायलंड पहिल्या, तर व्हियतनाम दुसर्‍या क्रमांकावर असतो. मात्र यंदा थायलंडच्या तुलनेत भारतात चांगला पाऊस झाला. त्यामुळे थायलंडमधील भात शेतीच्या क्षेत्रात घट झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून यंदा थायलंड केवळ 60 ते 70 लाख टन तांदळाची निर्यात करू शकणार आहे. तर व्हियतनाममध्ये कमी पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे या देशातील तांदळाची निर्यात घटणार आहे.

मात्र यावेळी आफ्रिकन देशांकडूनही नॉन बासमती तांदळाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्यामुळेही यावर्षी निर्यातीत वाढ होईल. मागील वर्षी आपली नॉन बासमती तांदळाची निर्यात ही मागील आठ वर्षातील सर्वात कमी झाली होती. परंतू यावर्षी प्रतिस्पर्धी देशांतून कमी निर्यात व आपल्या देशात येणारे तांदळाचे जास्त उत्पादन यामुळे आपली निर्यात मागील वर्षीच्या सुमारे 45 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. या निर्यात वाढीमुळे देशात परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाढेल. गेल्या वर्षी देशाची नॉन बासमती तांदळाची निर्यात खूप कमी झाली असल्याचे शहा यांनी सांगितले.

डीएसके प्रकरण : उलाढालीचा रिपोर्ट अडकला लालफितीत; तपास यंत्रणेकडून दिरंगाई

यामुळे वाढणार निर्यात
- थायलंडच्या तुलनेत भारतात चांगला पाऊस 
- व्हियतनाममध्ये कमी पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती
- दोन्ही देशांच्या तुलनेत यंदा भारतात पाऊस जास्त आहे. त्यामुळे लागवड वाढली आहे. परिणामी उत्पादन वाढ मोठ्या प्रमाणात

या देशात होते सर्वात जास्त भात शेती 

- भारत, थायलंड आणि व्हियतनाम

भारतातून या देशात होतो तांदूळ निर्यात

इराण, इराक व सौदी अरेबिया या देशांना बासमती तांदळाची निर्यात केली जाते. तर बांगलादेश, नेपाळ, बेनिन आणि सेनेगल या राष्ट्रांना नॉन बासमती तांदूळ निर्यात केला जातो.

आईसोबत बोलत थांबलेल्या तरुणावर हल्ला; तिघांनी लोखंडी सळईने केले वार​

मागील पाच वर्षांतील तांदळाची निर्यात टनांमध्ये
वर्षे निर्यात

वर्ष -          - टन     -          उत्पन्न कोटी रुपये
2015-16 - 1,05,10,391.45 -    38,201.92
2016-17 - 1,07,55,998.20 -    38,442.78
2017-18 - 1,27,05,245.12 -    49,837.98
2018-19 - 1,20,14,152.50  -   53,989.18
2019-20 -  94,95,318.69   -   45,390.23

चालू वर्षात अद्याप पर्यंत झालेली निर्यात 2020-21 (April-June) - 32,12,590.20  टन झाली असून त्याचे उत्पन्न 14,550.76 कोटी रुपये आहे. यंदा 140 लाख टन तांदळाची निर्यात होणार असल्याचा अंदाज व्यक्त तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be a big increase in rice production