Nirgudsar News : बिबट्याची नव्हे ही जंगली रान मांजराची पिल्ले.....

ऊस तोडणी चालू असताना ऊसात बिबट सद्रृष्य प्राण्याची पिले सापडली. ही पिल्ले बिबट्याची असल्याच्या संशयामुळे ऊस तोड कामगारांमध्ये घबराट पसरली.
cat
catsakal

निरगुडसर - जवळे (ता. आंबेगाव) येथे शेखर बाबासाहेब खालकर यांच्या पठारावरील शेतात ऊस तोडणी चालू असताना ऊसात बिबट सद्रृष्य प्राण्याची पिले सापडली. ही पिल्ले बिबट्याची असल्याच्या संशयामुळे ऊस तोड कामगारांमध्ये घबराट पसरली.

बिबट्याची मादी हल्ला करेल या भीतीतून ही पिल्ले ऊसातून बाहेर काढल्यानंतर दुसऱ्या उसाच्या शेतात निघून गेली पण वनविभागाने पिल्लांचे फोटो व व्हिडिओ पाहिल्यानंतर ती पिल्ले रानमांजराची निघाली. ही घटना मंगळवार (ता. ०५) रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली.

जवळे येथील घटनेची माहिती कळताच, वनविभागाचे रेस्क्यू टिम मेंबर दत्तात्रय राजगुरव व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ऊस तोडणी कामगारांजवळ चौकशी केली असता त्यांनी त्या पिल्लांचे फोटो दाखवले आणि ही पिल्ले बांधा शेजारच्या ऊसात पळाली असे सांगितले.

फोटो व्हिडिओ पाहिले असता ती पिल्ले साधारण दिड ते दोन महिने वयाची अगदी दुर्मिळ होत असणाऱ्या 'वाघाटी' (Rusty spotted cat) या अगदी दुर्मिळ होत चाललेल्या जंगली मांजराची असल्याचे लक्षात आले. हे वाघाटी रानमांजर शेतातील उंदीर, घुशी, साप, विंचू, ह्यासारख्या मनुष्याला त्रासदायक प्राण्यांवर गुजराण करून नियंत्रण ठेवते.

ह्या वाघाटी रानमांजराची उपयुक्तता सर्व ऊस कामगार यांना पटवून दिली व पून्हा असे वन्यजीव आढळल्यास संपर्क करण्यास सांगितले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com