lockdown
lockdown

खेड तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आहेत ही बंधने... 

राजगुरूनगर (पुणे) : प्रतिबंधित क्षेत्रे ( कंटेंटमेंट झोन) म्हणून घोषित केलेल्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण, आळंदी या नगरपरिषदा आणि १८ गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता किराणा दुकानांसह सर्व दुकाने पहिले पाच दिवस बंद राहणार आहेत, अशी माहिती खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी दिली. या पाच दिवसांत फक्त औषध दुकाने, दवाखाने, बँका आणि शासकीय कार्यालये सुरु राहणार आहेत, तर दूध घरपोच देण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

खेड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागल्याने कडक उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कोणालाही ये जा करता येणार नाही. मात्र, कंपन्या चालू राहणार आहेत.  कामगारांना तहसीलदार कार्यालयातून पास घेऊन कामावर जाता येईल. तालुक्यात एकूण ५७ गावांमध्ये कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील १८ गावे प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आलेली आहेत. ही १८ गावे वगळून इतर गावांमध्ये अंशतः लॉकडाउन असणार असून, तेथे सर्व दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. पहिल्या पाच दिवसांच्या कडक लॉकडाउननंतर पुढच्या पाच दिवसांत भाजीपाला व किराणा माल घरपोच देण्याचा आणि खते, बी-बियाणे दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेलीयांनी सांगितले.  

बँका आणि शासकीय कार्यालयांत अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त नागरिकांनी येऊ नये, आॅनलाईन सुविधांचा वापर करावा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या असून नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. चांडोली ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांनंतर आळंदी येथेही कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येईल. काही कंपन्यांकडून १५ रुग्णवाहिका खेडच्या तहसीलदारांनी मिळविल्या आहेत.   
 - संजय तेली
उपविभागीय अधिकारी, खेड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com