esakal | अरे बापरे ! डोळ्यात मिरची पूड टाकून सराफाला लुटले
sakal

बोलून बातमी शोधा

. thief threw chilli powder in his eye and robbed the bullion in baramati

''दुचाकी साईडला घ्या'', अशी दमबाजी करत दुचाकीवर लाथ मारून खाली पाडले. तिघांनी डोळ्यात मिरची पूड टाकून दागिन्याची पिशवी घेऊन पळून गेले. भैयाची दुचाकी थांबवून त्याच्याही डोळ्यात मिरची पुड टाकली होती. पिशवीतील 11 लाख 66 हजार 200 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल चोरट्यांनी पळवून नेले.

अरे बापरे ! डोळ्यात मिरची पूड टाकून सराफाला लुटले

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर(पुणे) : ''डोळ्यात मिरची पूड टाकून दुचाकीवरून सोन्याचे दागिने घेऊन चाललेल्या सराफाला लुटल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील पळशी गावच्या हद्दीत सोमवार (ता. २६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. याबाबत अमर रंगनाथ कुलथे रा. मोरगाव ता. बारामती यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दसऱ्या दिवशी पळशी गावात सोने-चांदीचे दुकान सुरू केले आहे. सोमवारी दुकान बंद करून फिर्यादी आणि भावाचा मुलगा भैया बालाजी कुलथे दोन दुचाकीवरून दागिने पिशवीत भरून मोरगाव च्या दिशेने जात असताना पळशी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर पाठीमागून तिघेजण पल्सर गाडीवरून आले. ''दुचाकी साईडला घ्या'', अशी दमबाजी करत दुचाकीवर लाथ मारून खाली पाडले. तिघांनी डोळ्यात मिरची पूड टाकून दागिन्याची पिशवी घेऊन पळून गेले. भैयाची दुचाकी थांबवून त्याच्याही डोळ्यात मिरची पुड टाकली होती. पिशवीतील 11 लाख 66 हजार 200 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल चोरट्यांनी पळवून नेले.

'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका

दरम्यान, फिर्यांदी थोड्या अंतरावरील बकरवाडी येथे जाऊन एकाच्या मोबाईलवरून मुर्टी येथील घडलेला प्रकार भावाला कळवला. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे घटनास्थळी गेले. परिसराची नाकाबंदी केली पण, चोरटे हाताला लागले नाहीत. अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अकरावी ॲडमिशन: दीड महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया तत्काळ चालू करा; अभाविपचं आंदोलन

loading image