सोसायटीच्या जिन्यात येऊन वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरण्यापर्यंत गेली चोरट्यांची मजल ! 

Thieves came to the stairs of the society stole the Mangalsutra an old woman
Thieves came to the stairs of the society stole the Mangalsutra an old woman
Updated on

पुणे : पहाटेच्यावेळी पायी फिरणाऱ्या महिलांना, तर कधी बसथांब्यावर, रिक्षातून उतरताना, मोबाईलवर बोलत थांबलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून नेण्याचे प्रकार शहरात आत्तापर्यंत घडत होते. परंतु दूध घेऊन घरी परतताना इमारतीच्या जिन्यात वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्याने जबरदस्तीने हिसकाविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांप्रमाणेच इमारतींमध्येही महिला सुरक्षित नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वडगाव बुद्रुक येथील निरंजन पार्क लेनमधील सुंदर पार्क इमारतीमध्ये 68 वर्षीय महिला त्यांच्या मुलीसमवेत राहतात. नातीला सांभाळण्यासाठी त्या तीन महिन्यांपासुन मुलीकडे राहण्यास आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजता त्या दूध आणण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या. 200 मीटर अंतरावरील दुकानातून दूध घेऊन त्या पुन्हा इमारतीमध्ये आल्या. पार्कींगमधून त्या जिन्याने तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या घरी जात होत्या. त्याचवेळी तेथे अचानक एक व्यक्ती आला. त्याने जिन्यातून वृद्ध महिलेच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानक त्याने, "तुम्ही आगोदर चला, मी मागून येतो' असे सांगून तो महिलेच्या पाठीमागून चालू लागला. 

पुण्याच्या रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये आग​

फिर्यादी, जिन्याची पहिली पायरी चढत होत्या, त्याचवेळी त्याने अचानक फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकाविले. त्यानंतर तो पार्कींगमधून इमारतीच्या बाहेर पळाला. त्यानंतर त्याने रस्त्यावर उभी केलेली त्याची दुचाकी घेऊन तेथून पळ काढला. या घटनेनंतर वृद्ध महिलेने आरडाओरडा केल्यानंतर नागरीक धावून आले, मात्र तोपर्यंत चोरटा निघून गेला होता. दरम्यान, इमारतीला सुरक्षारक्षक आहे, मात्र घटना घडली, त्यावेळी तो तेथे नव्हता. दरम्यान, महिलेने याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक के.एस.तनपुरे करीत आहेत. 

पदवी प्रवेशासाठी डिस्टिंक्शन सुध्दा ठरतेय किरकोळ; विद्यार्थी चितेंत​

शहरामध्ये जबरी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरीकांना बसत आहे. विशेषतः दोन दिवसांपुर्वीच गावाहून पुण्यात आलेल्या एका नागरीकाचा मोबाईल व पैसे हिसकावून घेणाऱ्या चोरट्यांना विरोध केला, त्यामुळे चोरट्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केल्याची घटना ताजी असतानाच इमारतीच्या जिन्यात घुसून जबरी चोरी करण्याची घटना घडल्याने नागरीकांमध्ये मात्र भितीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com