चोरट्यांनी आता महागड्या सायकल केले लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

सायकलींचे प्रकार

  • माउंटन टेरेन बाइक (एमटीबी) - २१ पेक्षा अधिक गिअर, किंमत १५ हजारांच्या पुढे ऑल
  • टेरेन बाइक (एटीबी) - २१ व २४ गिअरमध्ये उपलब्ध, किंमत २२ हजारांच्या पुढे
  • हायब्रीड सायकल - किंमत १५ हजारांच्या पुढे, २२ व २४ गिअरमध्ये उपलब्ध, दूर अंतरावरील सायकलिंगसाठी वापर ॲल्युनिमिनिअम बॉडीमुळे वजनाला हलकी, छोटे टायर

पिंपरी - दुचाकी, चारचाकी चोरणाऱ्या चोरट्यांनी आता महागड्या सायकल ‘लक्ष्य’ केले आहे. शहरात मागील वर्षभरात ४२ सायकल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली. हा आकडा यापेक्षाही मोठा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षात वाहन चोरीच्या एक हजार २९१ घटनांची नोंद झाली. यात दुचाकी एक हजार १४४, तीनचाकी २८ व चारचाकी ११९ वाहनांचा समावेश आहे. चोरांनी आता सायकलकडेही मोर्चा वळविल्याचे दिसून येते. आयुक्तालयाच्या हद्दीतील १५ पोलिस ठाण्यांमध्ये मागील वर्षभरात सायकल चोरीच्या ४२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी केवळ नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

फोन टॉपिंग म्हणजे मुलभूत तत्वांवर घाला घालण्याचे काम : थोरात

सध्या दोन हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत स्मार्ट सायकल बाजारात उपलब्ध आहेत. अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या या सायकलींना मागणीही अधिक आहे. अनेक जण व्यायामासह हौसेपोटी त्याची खरेदी करतात. त्याची अनेकदा कागदोपत्री नोंद नसते. 

चोरलेली सायकल एखाद्याला विकल्यानंतर पुन्हा तीच दुसऱ्याला विकताना कागदपत्रांची अडचण येत नाही. त्यामुळे महागड्या सायकली चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. 

सायकल चोरीचे २०१८ मध्ये सात गुन्हे, तर २०१९ मध्ये हा आकडा ४२ वर पोचला आहे.

चोरीला गेलेल्या सायकलींमध्ये गिअरच्या अत्याधुनिक सायकलचा अधिक समावेश आहे. त्या चोरून कमी किमतीत विकल्या जातात. तीन महिन्यांपूर्वी वाकड, निगडी ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सायकल चोरीच्या घटनांमध्ये हायब्रीड व एमटीबी, एटीबी या प्रकारांतील सायकलचा समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves now target expensive bicycles