लॉकडाउनचा 'असा' गैरफायदा घेत त्यांनी चोरले लाखोंचे लॅपटॉप!

Crime_Thieves
Crime_Thieves

पुणे : लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी नामी शक्कल लढविली. आणि बनावट चावीच्या सहाय्याने मॉलमधील लॅपटॉप शॉपीचा दरवाजा उघडून आतमधील तब्बल साडे बारा लाख रुपयांचे 10 लॅपटॉप चोरुन नेले.

ही घटना २३ मार्च ते २२ मे या कालावधीत बिबवेवाडीत घडली आहे. याप्रकरणी विष्णूकांत लढ्ढा (वय ३७, रा. गंगाधाम चौक) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लढ्ढा हे लॅपटॉपचे होलसेल विक्रेते आहेत. ते शहरातील वेगवेगळ्या भागातील आयटी कंपन्याना लॅपटॉपची विक्री करतात. बिबवेवाडीतील एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांचे कार्यालय आणि शॉप आहे. लॉकडाउनमुळे २३ मार्चला त्यांनी कार्यालय बंद केले. त्यानंतर पुन्हा ते कार्यालयात गेले नाहीत.

दरम्यान, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शनिवारी ते कार्यालयात गेले. त्यावेळी त्यांना त्यांच्या कार्यालयात ठेवलेले साडे बारा लाख रूपये किंमतीचे १० लॅपटॉप चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गौतम खरात करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com