कोरोना लशीचा तिसरा टप्पा उद्यापासून

Covid-19-Vaccine
Covid-19-Vaccine

ससून रुग्णालयात ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या कोव्हिशिल्डच्या चाचण्या
पुणे - कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना उद्यापासून (ता. २१) सुरवात होणार आहे. ही लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादित करण्यात येणार आहे. ती ऑक्‍सफर्ड विद्यापीठाने विकसित केली असल्याची माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. तांबे म्हणाले, ‘‘येत्या सोमवारपासून (ता. २१) तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू करण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी काही स्वयंसेवकही पुढे आले आहेत. शनिवारपासूनच आम्ही स्वयंसेवकांची भरती करायला सुरवात केली आहे. साधारणपणे १५० ते २०० स्वयंसेवकांना ही लस देण्यात येईल.’’ दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पुण्यातीलच केईएम रुग्णालय आणि भारती विद्यापीठ रुग्णालयात घेण्यात आल्या होत्या. आता तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या ‘ससून’मध्ये सुरू होत आहेत. 

बंदी उठवली 
इंग्लंडमधील स्वयंसेवकांना कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान त्रास जाणवल्याने अस्ट्राझिंका या कंपनीने चाचण्या थांबविल्या होत्या. अस्ट्राझिंका ही सिरम इन्स्टिट्यूटची युरोपातील भागीदार कंपनी आहे. भारतातही औषध प्रशासनाने चाचण्यांना स्थगिती दिली होती. परंतु, इंग्लंडमध्ये स्वयंसेवकांची शहानिशा झाल्यानंतर चाचण्यांवरील बंदी उठवण्यात आली. त्यामुळे भारतातही १५ सप्टेंबरला मानवी चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली.

कोरोना लशीची जगभरातील सद्यःस्थिती

  • जगात नऊ लशी तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोचल्या  आहेत
  • सर्वांचे निकाल पुढील महिनाभरात येतील 
  • सर्वांत अग्रेसर ऑक्‍सफर्डची ‘कोव्हिशिल्ड’ लस
  • रशियाच्या स्फुतनिक-५ लशीसंदर्भात डॉ. रेड्डी यांच्याशी करार
  • भारतातील वितरणासाठी डॉ. रेड्डी यांना १० कोटी डोस मिळणार 
  • या वर्षीच्या शेवटापर्यंत लस उपलब्ध होणार, असा डॉ. रेड्डींचा दावा
  • ‘सीएसआयआर’च्या सहकार्याने अरबिंदो फार्मा ही कंपनी स्वदेशी लस विकसित करत आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी ससून रुग्णालयाला स्वयंसेवकांची गरज आहे. इच्छुकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा - ८५५०९६०१९६, ८१०४२०१२६७

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com