सिंहगडाच्या वारकऱ्याची तेराशेवी वारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंहगडाच्या वारकऱ्याची तेराशेवी वारी!

सिंहगडाच्या वारकऱ्याची तेराशेवी वारी!

पुणे : सह्याद्रीच्या रांगेत अनेक गड-किल्ले इतिहासाची साक्ष देत निसर्गप्रेमींना साद घालत असतात. याच इतिहासाची साक्ष देणारा सिंहगड किल्ला शुक्रवार पेठेतील प्रकाश दंडनाईक यांनी तब्बल १३०० वेळा सर केला आहे.

हेही वाचा: ऑनलाइन पद्धतीने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न

ऊन-वारा-पाऊस ही सारी आव्हाने अंगावर झेलत दंडनाईक दर आठवड्यातून एकदा सिंहगडावर जातात. त्यांनी नुकतीच तेराशेवी सफर पूर्ण केली. त्यांनी जानेवारी १९९३ मध्ये सिंहगडवारीला सुरवात केली. पायथ्यापासून गडावरील देव टाक्यापर्यंत पायी जायचे आणि तेथून परतायचे, असे त्यांच्या मोहिमेचे स्वरूप आहे.

हेही वाचा: अत्याचाराचे गुन्हे ‘वूमन अ‍ॅट्रॉसिटी’ म्हणून दाखल करून घ्यावेत : चित्रा वाघ

दंडनाईक यांनी इंटेरिअर डेकोरेटिंगचा व्यवसाय सांभाळून ट्रेकिंगची आवड जोपासली आहे. तरुणांना गडावर जाण्यासाठी ते सतत प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या या सामाजिक प्रबोधनातून प्रेरणा घेऊन त्यांचे मित्र राजू शेठ, सुरेंद्र तापकीर हे सातत्याने त्यांच्याबरोबर सिंहगड वारीत अनेक वर्षांपासून सोबत आहेत. तसेच, प्रकाश दंडनाईक यांचा मुलगा प्रतीक हा वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांच्याबरोबर या मोहिमेत सहभागी होत आहे. या यशाबद्दल त्यांचा सिंहगड परिवार व वृक्षवल्ली परिवारातर्फे तसे गडकरी मित्र, चैतन्य योग साधनेचे सभासद व त्यांच्या कुटुंबीयांच्या समवेत सिंहगड पुणे दरवाजा येथे सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ गिर्यारोहक, पुणे सायकल प्रतिष्ठानचे सक्रिय सभासद, जुगल राठी यांनी त्यांना पुणे दरवाजाची प्रतिकृती व मानपत्र देऊन सन्मानित केले.

हेही वाचा: राज्यात यंदा विक्रमी ऊस गाळप होणार

आठवड्यातून एकदा करा गिर्यारोहण

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत निरोगी, दीर्घायुष्य लाभण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी गिर्यारोहण करावे. त्यामुळे आपली शारीरिक व मानसिक क्षमता वाढते व स्वतःवर संयम ठेवता येतो. तसेच, आपली संस्कृती व ऐतिहासिक वारशाची जपवणूक करता येते. कोणतेही कार्य करताना सातत्य ठेवा व निरोगी, आनंदी आयुष्य जगा हीच खरी आयुष्याची पुंजी आहे,’’ असा संदेश प्रकाश दंडनाईक हे तरुणाईला देतात.

  • १५ वेळा - हिमालयात पदभ्रमण

  • ५० पेक्षा -अधिक महाराष्ट्रातील गड-किल्ले सर

"सिंहगडावरील अवघड वाटणारी चढाई आत्मियतेमुळे नंतर सोपी वाटू लागली. श्रीराम साठये, दिवंगत आबा महाजन यांच्या प्रेरणेतून प्रोत्साहन मिळाले. तसेच, ज्योतिकुमार कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व सिंहगड वारकरी व हितचिंतकांनी पुणे दरवाज्याजवळ माझे स्वागत केले, ते अविस्मरणीय आहे."

- प्रकाश दंडनाईक, गिर्यारोहक

टॅग्स :Pune Newssinhagad