

Three Leopards Spotted Together in Thorandale, Ambegav
sakal
निरगुडसर : आंबेगाव तालुक्यातील थोरादळे येथील गव्हाळी-उपळीमळा येथे शेतावर एकाच वेळी तीन बिबटे फिरताना दिसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्यांचा वावर वाढला असून पाळीव जनावरे तसेच शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.रात्रीच नव्हे तर आता दिवसाढवळ्याही बिबटे फिरताना दिसत असल्याने नागरिक घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत.वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी येऊन पाहणी केली.मंगळवारी सकाळी या परिसरात बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे.