esakal | पेसा क्षेत्रातील कायम राहणाऱ्यांना सवलतीचा लाभ मिळावा- सुभाष मोरमारे । PESA
sakal

बोलून बातमी शोधा

पेसा क्षेत्रातील कायम राहणाऱ्यांना सवलतीचा लाभ मिळावा

पेसा क्षेत्रातील कायम राहणाऱ्यांना सवलतीचा लाभ मिळावा

sakal_logo
By
चंद्रकांत घोडेकर ः सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : पेसा क्षेत्रात कायम वास्तव्यास असलेल्या व पारंपरिक रहिवासी असलेल्या बिगर आदिवासी समाज हा आमचा बांधव आहे. त्यांना या आदिवासी समाजाप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूची क्षेत्रातील सवलतींचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करून न्याय मिळवून देणेसाठी आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत. असे प्रतिपादन आदिवासी नेते व माजी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे यांनी केले.

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस, खाम नदीला पूर

शिनोली (ता आंबेगाव) येथे पेसा हक्क कृती समितीची बैठक सुभाष मोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आदिवासी भागातील सर्वच समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजात कोणतेही मतभेद नसून संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येक समाजाला आपला हक्क मिळाला पाहिजे.

यासाठी आम्ही तुमच्या बरोबरीने सरकार दरबारी पाठपुरावा करू. यावेळी पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, जिल्हा परिषदेच्या सदस्या रूपालीताई जगदाळे, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, मा.जिल्हापरिषद सदस्य विजय आढारी, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष मधुकर बोऱ्हाडे , संदीप चपटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: जागतिक हृदय दिवस : हृदयाशी व्हा ‘डिजिटली कनेक्ट’

यावेळी पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी आदिवासी व बिगर आदिवासी असा भेदभाव नसून ही कायद्याची लढाई आहे. पेसा हक्क कृती समितीचे मागणी रास्त असून आपण सगळेजण कायद्याचा अभ्यास करून टिपण्णी तयार करून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्फत राज्यपाल याना भेटून नवीन अध्यादेश राज्यसरकारकडून काढून न्याय देण्याचे काम करू. विजय आढारी यांनी पेसा हक्क कृती समितीचा लढा हा संविधानिक व न्यायिक आहे.

हेही वाचा: देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर, ३० ऑक्टोबरला मतदान

मानवतावादी दृष्टीकोनातून अनुसूची क्षेत्रात रहाणाऱ्या बिगर आदिवासी समाजाला राजकीय, नोकरीमध्ये, योजनांमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी आम्ही पेसा हक्क कृती समितीच्या बरोबरीने शासन दरबारी पाठपुरावा करू. यावेळी स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सरचिटणीस गणपत ढेरंगे यांनी , प्रास्ताविक पेसा हक्क कृती समितीचे सचिव गौतम खरात यांनी, सूत्रसंचालन पुरुषोत्तम फदाले यांनी तर आभार नंदकुमार सोनावले यांनी मानले. यावेळी हुसेन शेख, अमोल अंकुश, विलास बोऱ्हाडे, सिताराम लोहोट, अक्षय साळवे, रुपालिताई जगदाळे, सलीमभाई तांबोळी, कलावती पोटकुले, आत्माराम बोऱ्हाडे, गोरक्षनाथ पोखरकर यांनी मनोगते व्यक्त करून न्याय मिळणेची मागणी केली.

loading image
go to top