हजारो जण 'सारथी'साठी येतायेत पुण्याच्या दिशेने : छत्रपती संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 January 2020

 छत्रपती संभाजीराजे म्हणाले, लाक्षणिक उपोषणाचा मार्ग मी निवडला आहे. लोकशाही मार्गाने, शांतता पूर्वक कुठलाही कायदा हातात न घेता आम्ही हा लढा उभारणार आहोत. 

पुणे : मी 'सारथी' संस्थेसाठी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे कळताच महाराष्ट्रातील हजारो युवकांनी आणि समाज धुरिणांनी पाठिंबा देत असतानाच काळजीही व्यक्त केली. हजारो लोक उद्या पुण्याच्या दिशेने येण्याच्या तयारीत आहेत. समाजमाध्यमांतून अनेकजण पाठिंबा व्यक्त करताना दिसत आहेत, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे. 

त्यांनी माध्यमांसाठी काढलेल्या एका पत्रकात आपली भूमिका स्पष्ट केेली आहे. त्यांनी त्यामध्ये असे म्हटले आहे, मराठा समाजाच्या हक्कांसाठी मी गेली अनेक वर्षे लढत आहे. मला मराठा समाजाची बाजू मांडताना कधीही संकोच वाटला नाही. अनेक नेत्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला एका विशिष्ट जातीच्या मर्यादेत बघितलं जाईल. मग तुम्ही राजकारण कसे काय करणार?

हेही वाचा - एसटी चालकाचा सुटला ताबा अन.... 

माझी भूमिका ही सुरुवातीपासून स्पष्ट आहे. मला राजकारणापेक्षा समाज महत्वाचा वाटतो. मी शिवशाहूंचा वारसदार आहे. सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन त्या सर्वांचा उत्कर्ष करण्याची शिकवण मला माझ्या घराण्यातील पूर्वजांनी दिली आहे. आम्हाला सर्व जाती, सर्व समाज समान आहेत. 

परंतू आज घडीला मराठा समाज हा अत्यंत विपरीत परिस्थितीतून वाटचाल करतोय. तो अडचणीत सापडलाय. महाराष्ट्रात मोठा भाऊ म्हणून ओळखला जाणारा, ग्रामीण समाज व्यवस्थेचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा समाज सर्व बाजूनी पिछेहाटीच्या मार्गावर आहे. त्यांची बाजूही कुणीतरी मांडलीच पाहिजे. आणि ती जबाबदारी माझी आहे असं मला मनापासून वाटतं.

जरुर वाचा -  काळूबाईकडे निघालात...मग हे वाचाच

मराठा समाजाचा आजपर्यंत केवळ राजकारणासाठी वापर झाला. त्यांच्या मूळ दुखण्याकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. आरक्षणाचा लढा असेल, किंवा इतरही अनेक मागण्या असतील त्यासाठी मी जमेल तितके प्रयत्न करत असतो. आज 'सारथी' सारखी अत्यंत उपयुक्त असलेली संस्था काही अधिकारी आणि काही झारीतील शुक्राचार्य मिळून किरकोळ स्वार्थासाठी बंद पाडत असतील, तिला बदनाम करण्याचा घाट घालत असतील तर ते आम्ही होऊ देणार नाही. 

अनेक दिवसांपासून मी याविषयी सर्व त्या स्तरावर पाठपुरावा करत आहे. पण निर्णय काही होताना दिसत नाही. म्हणून लाक्षणिक उपोषणाचा मार्ग मी निवडला आहे. लोकशाही मार्गाने, शांतता पूर्वक कुठलाही कायदा हातात न घेता आम्ही हा लढा उभारणार आहोत. अशी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands are coming for Sarathi towards Pune says Chhatrapati Sambhajiraje