मॅरेथॉनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नाळ समाजाशी जोडली जाते : डॉ. येरवडेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 डिसेंबर 2019

मॅरेथॉनच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांची नाळ समाजाशी जोडली जाते. विद्यापीठाचं समाजाशी जोडलेलं नातं हे फक्त सेवा पुरविण्यापुरतंच नसतं, हेच या मॅरेथॉनमधून स्पष्ट झाले,'' असा विश्‍वास फॅकल्टी ऑफ हेल्थ सायन्सेस सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर यांनी व्यक्त केला. 
 

पुणे : "मॅरेथॉनच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांची नाळ समाजाशी जोडली जाते. विद्यापीठाचं समाजाशी जोडलेलं नातं हे फक्त सेवा पुरविण्यापुरतंच नसतं, हेच या मॅरेथॉनमधून स्पष्ट झाले,'' असा विश्‍वास फॅकल्टी ऑफ हेल्थ सायन्सेस सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तर माझा पुतळा जाळा, पण... : पंतप्रधान मोदी

हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी हेल्थ सायन्सेस सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे वैद्यकीय व्यवस्था केली होती. त्या पार्श्‍वभूमिवर डॉ. येरवडेकर म्हणाले, "मॅरेथॉनसारख्या उपक्रमांमधून नव्या गोष्टींचे धडे विद्यार्थ्यांना मिळतात. ते दैनंदिन आयुष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. जागतिक आरोग्य संघटनेने हेल्थ प्रमोटिंग युनिव्हर्सिटीची संकल्पना मांडली आहे. त्या संकल्पनेवर आधारित हेल्थ प्रमोटिंग विद्यापीठ स्थापण्याचा देशातील पाहिला प्रयत्न सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी फक्त शिक्षण न देता त्याला आरोग्याचा लाभ दिला पाहिजे. आरोग्य चांगलं असेल तर शैक्षणिक गुणवत्ता वाढविणं सोपं जातं, हा संदेश या मॅरेथॉनमधून मिळाला.'' 

केजीएफचा दुसरा भाग लवकरच पडद्यावर; संजय दत्त महत्वाच्या भूमिकेत

आरोग्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या बहुतांश सहभागी स्पर्धकांना स्नायूंचा त्रास जाणवत होता. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. काही स्पर्धांचा ईसीजी काढावा लागला. 

अशी होती वैद्यकीय व्यवस्था 
- 30 खाटांचे सुसज्ज वैद्यकीय केंद्र 
- 6 वैद्यकीय साहाय्य केंद्रे 
- 22 डॉक्‍टर 
- 30 नर्सिंग स्टाफ 

सहभागींना दिलेली वैद्यकीय साहाय्य 
वेगवेगळ्या वैद्यकीय पथकांनी हजारावर सहभागींना वैद्यकीय साहाय्य केले. त्यात सहाशे सहभागींना स्पर्धेच्या ठिकाणी वैद्यकीय मदत करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thousands of students is connected Through marathon to community says Dr. Yeravadekar