कंटेन्मेंट झोनमधील निर्बंधाबाबत जिल्हाधिकारी म्हणाले...

Corona-Virus
Corona-Virus

पुणे : लॉकडाऊन-5 मधील 'मिशन बिगीन अगेन' मध्ये काही शिथिलता देण्यात आली असली तरी पुणे शहर आणि जिल्ह्यांमधील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच, प्रतिबंधित क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम राहतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी राम यांनी सोमवारी वेब प्रेस कॉन्फरन्सद्वारे ही माहिती दिली. ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये हॉटेल्स, केश कर्तनालय सुरु करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. तसेच, खासगी कार्यालयेही सुरू करता येणार नाहीत. ‌आंतरजिल्हा बस वाहतूक सुरू केलेली नाही. परंतु जिल्हांतर्गत बस वाहतूक सुरू करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. 

रेल्वेने शहरात आलेल्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात येईल. तसेच, या प्रवाशांना घरात विलगीकरण कक्षात (होम क्वारंटाइन) राहावे लागेल. जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

तुळशीबाग, मंडईतील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू : 
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, गेल्या 15 दिवसांत शहरातील प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर 1 हजार 450 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, काही प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन केले. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर आले आहेत. शहरातील तुळशीबाग आणि मंडईतील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. 

... तर कंटेन्मेंट झोनमधून बाहेर : पोलिस आयुक्त 
पोलिस आयुक्त के. वेंकटेशम म्हणाले, स्वयंशिस्त पाळली तर कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडाल. नागरिकांनी स्वयंशिस्तीवर भर द्यावा. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर याचा वापर करावा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com