esakal | कोरोनाला बसणार आळा; पुण्यातील तंत्रज्ञांनी विकसित केलं विषाणूरोधी आवरण!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Covid-19

रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणे, स्वच्छतागृहे, शाळा महाविद्यालयांमध्ये सतत स्पर्श होणाऱ्या ठिकाणच्या संसर्गाला आळा घालता येईल. ​

कोरोनाला बसणार आळा; पुण्यातील तंत्रज्ञांनी विकसित केलं विषाणूरोधी आवरण!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : रुग्णालये किंवा सार्वजनिक ठिकाणी बसविलेल्या दरवाजांचे हॅंडल, पाण्याचे नळ, विजेची बटणे आदींच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणावर सुक्ष्मजीवांचे वास्तव्य असते. संसर्गजन्य विषाणू अशा पृष्ठभागावर पडला तर मोठ्या प्रमाणावर संसर्गाची भीती असते. यावर उपाय म्हणून पुण्यातील टेकएक्‍सपर्ट इंजिनिअरिंग या कंपनीने विषाणूरोधक नॅनोपार्टीकल्सच्या विषाणूरोधक आवरण विकसित केले आहे. 

गुड न्यूज गुड न्यूज : कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा रेट मंदावतोय; वाचा सविस्तर आकडेवारी

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जे.व्ही. इंगळे म्हणाले, "जर्मन कंपनीच्या सहकार्याने भारतात प्रथमच हे तंत्रज्ञान आम्ही विकसित केले आहे. वस्तूंवरील विषाणू केवळ वीस मिनिटात नष्ट करणारे हे आवरण किमान तीस वर्षे टिकते. औषधी गुणधर्म असलेल्या चांदीच्या धातूचे 20 ते 30 नॅनोमीटर आकाराचे सूक्ष्म कण आणि इतर घटकांचा समावेश या आवरणात आहे.'' सतत स्पर्श होणाऱ्या वस्तूंना हे सूक्ष्म आणि पारदर्शक आवरण दिल्यास जिवाणू आणि विषाणूंच्या प्रसाराला प्रतिबंध करता येईल.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली घोषणा!

कसे रोखते विषाणूंची वाढ :
- सिल्वर नॅनोपार्टीकल आणि विशिष्ट रसायनांद्वारे 'एजीप्युअर'हे रसायन तयार केले 
- हे रसायन सूक्ष्मजीव, ग्राम निगेटिव्ह, ग्राम पॉझिटिव्ह अशा दोनही जिवाणूंना विरोध करते 
- एजीप्युअर या रसायनामध्ये सिल्वरचे ऑक्‍सिडेशन होते 
- त्यापासून तयार झालेले सिल्वर आयन्स पृष्ठभागावरील सुक्ष्मजीवांची वाढ थांबवतात. 
- माणूस आणि प्राण्यांसाठी सुरक्षित असलेले एजीप्युअर पर्यावरण पूरक आहे.

पुण्यातील `या` कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची होतीये उपासमार

आवरणाचे फायदे :
- रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणे, स्वच्छतागृहे, शाळा महाविद्यालयांमध्ये सतत स्पर्श होणाऱ्या ठिकाणच्या संसर्गाला आळा घालता येईल. 
- किफायतशीर किमतीत उपलब्ध (5 ते 10 टक्के वाढ) 
- आवरण जास्त दिवस टिकते. 
- धातू, काच आणि विशिष्ट प्लास्टिकलाही आवरण शक्‍य 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नॅनोपार्टिकल्स आधारित विषाणूरोधक कोटिंगचे हे तंत्रज्ञानाकडे कोरोनापुर्वी फार महत्त्व दिले जात नव्हते. परंतु आम्ही वर्षानुवर्षे त्यावर काम चालू ठेवले. आता अनेकांना त्याची आवश्‍यकता आणि गरज लक्षात आली आहे. मागणीनुसार आम्ही उत्पादनाला सुरवात केली आहे. भविष्यात हे क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक तर होईल त्याचबरोबर रोजगार निर्मितीही होईल. 
- जे.व्ही. इंगळे, व्यवस्थापकीय संचालक, टेकएस्पर्ट इंजिनिअरिंग 

loading image