पिंपरीत घरासमोर खेळण्यावरून वाद; लहान मुलांना ठार मारण्याची धमकी; महिलेला शिवीगाळ

Threat to kill children playing in front of house in Pimpri
Threat to kill children playing in front of house in Pimpri
Updated on

पिंपरी : ''लहान मुले आमच्या घरासमोर खेळायला कशाला पाठवतेस, असे म्हणत महिलेला शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  तसेच  लहान मुलांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार थेरगाव येथे समोर आला आहे.

CAA, NRC बद्दल शरद पवारांचे मत पाहा UNCUT (Video)

मनीषा राजू परदेशी (रा. न्यु साईनाथनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रईस रफिक मोमिन, आशु रईस मोमिन, हिना फिरोज मोमिन (सर्व रा. पानसरेनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे-जबलपूर रेल्वे आता धावणार वर्षभर

गुरूवारी (ता.19) सायंकाळी चारच्या सुमारास फिर्यादी यांची लहान मुले रस्त्यावर खेळत होती. त्यावेळी 'तुझी लहान मुले आमच्या घरासमोर खेळायला कशाला पाठवतेस' असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच लहान मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर रस्त्यावर पडलेली वीट फिर्यादीच्या डोक्‍यात मारून त्यांना जखमी केले. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com