लग्नास नकार दिल्याने गुप्तांगावर केले वार; पुणे जिल्ह्यात किळसवाणा प्रकार

राजकुमार थोरात
Thursday, 14 January 2021

शेळगाव (ता. इंदापूर) येथे नामदेव बाजी सकट (वय ४५) यांनी लग्नास नकार दिल्याने त्यांच्यावर शस्त्राने वार केल्याची घटना घडली.

वालचंदनगर : शेळगाव (ता. इंदापूर) येथे नामदेव बाजी सकट (वय ४५) यांनी लग्नास नकार दिल्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

पुणेकरांच्या खिशाला कात्री; का होतेय पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ?

याप्रकरणी प्रकाश नामदेव मोहिते (वय ५०), अनिल शिवाजी गुळीक (वय २८),  भाऊ उर्फ भावड्या नामदेव मदने (वय ३३) (रा. सर्वजण,शेळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव सकट यांचे मूळ गाव बोरी असून, ते शेळगावमध्ये पाहुण्याकडे नेहमी ये-जा करीत असत. ते मजूरी करुन स्वत:ची उपजिविका करीत आहेत. बुधवारी (ता. १३) रोजी मजूरी करुन शेळगावमधील शिवा मदने या मित्राच्या घरी मुक्कामी गेले असता. गुरुवारी (ता. १४) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रकाश मोहिते, अनिल गुळीक, भाऊ उर्फ भावड्या मदने हे शिवा मदने यांच्या घरी गेले. व सकट यांना प्रकाश मोहिते यांच्या नांदत नसलेल्या मुलीशी लग्न करण्याचा हट्ट करुन शिवीगाळ करु लागले.

आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही 

नामदेव सकट यांनी लग्नास नकार दिल्याने त्यांच्या गुप्तांग, पोटावर वर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी सकट यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल करुन तातडीने अटक केली. अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अुतल खंदारे, प्रकाश माने, विकास निर्मल करीत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested for beating youth

Tags
टॉपिकस
Topic Tags: