पुण्यातील नियोजित वैद्यकीय महाविद्यालयासाठी तीन करार, महापौरांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

पुणे महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या "भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया'साठी महापालिका आणि पुणे महानगरपालिका संचालित वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्यात तीन सामंजस्य करार करण्यात आले. या करारामुळे महाविद्यालयाच्या कामाला गती मिळणार असल्याचा दावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला.

पुणे - पुणे महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया'साठी महापालिका आणि पुणे महानगरपालिका संचालित वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्यात तीन सामंजस्य करार करण्यात आले. या करारामुळे महाविद्यालयाच्या कामाला गती मिळणार असल्याचा दावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये हे तीन करार करण्यात आले आहेत. बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, मालमत्ता उपायुक्त राजेंद्र मुठे, सामन्य प्रशासन विभागाचे सुनील इंदलकर, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, सहायक आरोग्यप्रमुख अंजली साबणे, विधी अधिकारी ऍड मंजुषा इंदुले, ऍड निशा चव्हाण उपस्थित होते. 

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

या संदर्भात महापौर मोहोळ म्हणाले, ' 'महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स'कडून आलेल्या निर्देशानुसार कमला नेहरू हॉस्पिटल आणि वैद्यकीय शिक्षण ट्रस्टमधील करारनामा, तसेच मालमत्ता व्यवस्थापन व वैद्यकीय शिक्षण ट्रस्टसाठी देत असलेल्या जमिनीकरता करारनामा आणि पुणे महानगरपालिका व वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्यामधील करारनामा या तिन्ही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करत मान्यता दिली.' 

Breaking : मुसळधार पावसाचा फटका; पुणे विद्यापीठाचे आजचे पेपर पुढे ढकलले

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्टमध्ये पक्षनेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहर अभियंता, मुख्यलेखापाल, मालमत्ता उपायुक्त, मुख्य विधी अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधिक्षक यांचाही समावेश सभासद म्हणून ट्रस्टमध्येकरण्यात आला आहे, असेही मोहोळ म्हणाले. 

Video:पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिरासमोरून वाहत होतं पाणी; रात्री उशिरा पावसाची विश्रांती

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three contracts for a planned medical college in Pune Mayor Information