पुणे : पावणे तीन लाखांचे पाळीव श्‍वान चोरणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

लासपसो जातीचे तब्बल पावणे तीन लाख रुपये किंमतीचे पाळीव श्‍वान चोरुन नेणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. 

पुणे : लासपसो जातीचे तब्बल पावणे तीन लाख रुपये किंमतीचे पाळीव श्‍वान चोरुन नेणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निरंजन आनंद कुलकर्णी (वय 34, रा. रक्षलिका सोसायटी, धनकवडी), अमोल मारुती चव्हाण (वय 35, रा. त्रिमल हॉस्पीटलजवळ, अप्पर इंदिरानगर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सचिन ऍन्थोनी (वय 36, रा. निंबाळकरवाडी, कात्रज) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पाळीव श्‍वानांना प्रशिक्षण देतात.

खरंच, पाकिस्तानातील गैरमुस्लिमांची संख्या २३% वरुन ३.७%वर घसरली का?

गुजर निंबाळकरवाडी जवळ सतीश नवले यांचे फार्महाऊस आहे. या फार्महाऊस समोरील मोकळ्या जागेत फिर्यादी हे पाळीव श्‍वानांना प्रशिक्षण देतात. त्यांच्याकडे वेगवेगळ्या जातीचे श्‍वान आहे. त्यामध्ये लासपसो जातीच्या श्‍वानाचाही समावेश आहे. या श्‍वानाची किंमत तब्बल पावणे तीन लाख रुपये इतकी आहे.

तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

दरम्यान, फिर्यादी यांच्या ओळखीच्या कुलकर्णी व चव्हाण यांनी लासपसो जातीचे श्‍वान चोरुन नेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी के. आर.बढे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three lakh pet dogs stolen arrested in Pune