Ambegaon News : आंबेगावमध्ये ऊस तोडणीदरम्यान सापडली बिबट्याची तीन पिल्ले
leopard cubs in sugarcane field : आंबेगाव तालुक्यातील कैलास वाघ यांच्या शेतात ऊस तोडणीदरम्यान डोळे न उघडलेल्या तीन बिबट्याच्या पिल्ला सापडली. वनविभागाने पिल्लांची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित जागी ठेवली, ट्रॅप कॅमेरे लावून मादीवर नजर ठेवल्या.
निरगुडसर : येथील कैलास बबन वाघ या शेतकऱ्याच्या शेतात ऊसाची तोडणी सुरू असताना ऊस तोडणी मजुरांना १० ते १५ दिवसाची डोळे न उघडलेली बिबट्याची तीन पिल्ले बुधवार (ता.११) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सापडली.