इंदापुरात वाढला कोरोनाचा धोका, आणखी तीन रुग्णांची भर

डाॅ. संदेश शहा
Wednesday, 1 July 2020

इंदापूर शहरात एक व तालुक्यात दोन कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासन व जनतेच्या चिंतेत भर पडली आहे. तालुक्यात तब्बल 11 दिवसात

इंदापूर (पुणे) : इंदापूर शहर व तालुक्यात आज कोरोनाचे 3 रुग्ण आढळले असून, ५० जणांच्या घश्यातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.  

कोरोना झाला आमदारांना...ग्रामस्थांचा जीव टांगणीला

इंदापूर शहरात एक व तालुक्यात दोन कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासन व जनतेच्या चिंतेत भर पडली आहे. तालुक्यात तब्बल 11 दिवसात ७ कोरोनाग्रस्त नवीन रुग्ण आढळून आल्याने इंदापूरकरांची चिंता वाढली आहे. आज इंदापूर शहरातील एका 57 वर्षीय पुरुषाचा आणि जंक्शन गावातील एका 35 वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह, तर लाकडी येथे तीन दिवसांपासून आलेल्याचा अहवालदेखील कोरोनाबाधित असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. सुरवड येथील एका संशयिताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

बारामतीत कोरोनाची पुन्हा एन्ट्री

जंक्शन येथील महिला पुणे येथील बिर्ला रुग्णालयात उपचार घेत असून, तिच्या संपर्कात जंक्शन परिसरातील जवळपास 13 व्यक्ती आल्या आहेत, तर इंदापूर शहरातील रुग्ण पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या थेट संपर्कात 8 व्यक्तींचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या 21 व्यक्तींना इंदापूर कोवीड सेंटरमध्ये ठेवण्याची प्रकिया व त्यांचे स्वॅब घेतले जात असून, त्याचा अहवाल 2 जुलै रोजी येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक  डॉ.  एकनाथ चंदनशिवे यांनी दिली. 

हवेलीतील रुग्णांची संख्या पोहचली...

इंदापूर तालुक्यात आता कोरोनाचे एकूण २६ रुग्ण झाले असून, त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १७ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. पुणे येथे 4, तर मुंबई मधील टाटा रुग्णालयात एकावर उपचार सुरु आहे.  इंदापूर कोवीड केअर सेंटरमध्ये एका रुग्णावर, तर बारामतीमधील रुई ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु असल्याचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंदापूर शहरातील महतीनगर परिसरात १ कोरोना रुग्ण आढळल्याने हा परिसर नगर परिषदेच्या वतीने सील करण्यात आला असून, येथे पुन्हा निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याचे नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ.  प्रदिप ठेंगल यांनी सांगितले. इंदापूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्ण आढळून आला असला, तरी घाबरून जाऊ नका, घरी रहा व सुरक्षित रहा आणि शासकीय सूचनांचे पालन करा, असे आवाहन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three more corona patients were found in Indapur taluka