नाशिक-पुणे महामार्गावर एसटी बसच्या अपघातात एकाचा मृत्यू; तीन प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

भोसरीकडून पुण्याच्या दिशेने निघालेली भोसरी पोलिस गुन्हेशाखेजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अंबादास दिनकर खेडकर (वय-३२) असे मृत्यू झालेल्या बस वाहकाचे नाव आहे. तर गंगाराम दिनकर सानप असे जखमी बस चालकाचे नाव आहे.  

भोसरी : नाशिक- पुणे महामार्गावर नाशिक फाट्याजवळ बस आणि ट्रकचा बुधवारी (ता. २०) पहाटे भीषण अपघात झाला. या घटनेत एसटी बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तीन प्रवासीही जखमी झाले आहेत.

महावितरणाच्या केबलचा शॉक लागून भाजलेल्या महिलेचा मृत्यू

भोसरीकडून पुण्याच्या दिशेने निघालेली भोसरी पोलिस गुन्हेशाखेजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अंबादास दिनकर खेडकर (वय-३२) असे मृत्यू झालेल्या बस वाहकाचे नाव आहे. तर गंगाराम दिनकर सानप असे जखमी बस चालकाचे नाव आहे. याप्रकरणी बस चालकाला भोसरी भोसरी पोलीस तपास करीत आहेत. 
खेळाडुकडे मागितली 25 हजाराची लाच; 'एसीबी'कडून गुन्हा दाखल, एकास अटक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three passengers were injured and One killed in ST bus accident on Nashik-Pune highway